<
जळगांव( धर्मेश पालवे):- महाराष्ट्र उत्तर व पूर्व भागात मुसळधार पावसाने गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून थैमान घातले असून, उत्तर महाराष्ट्रातही धुळे,नंदुरबार,व जळगांव या जिल्ह्यातील पावसाची सर्वंधिक नोंद केली गेली आहे.जिल्ह्यात पावसाच्या सतत धार मुळे ,नद्या नाल्या सह शहरी भागातील मुख्यत्वे काही भागातील भाग हा नाल्यातील व गटारीतील पाण्याने व्यापला गेला आहे,याविषयी तक्रारी ही मनपा कडे दाखल झाल्या आहेत,या अनुषंगाने जिल्यातील नेते आमदार मा.राजू मामा भोळे यांना शहरी पाहणी दरम्यान रस्त्यात अडवत एस टी वर्कशॉप चौक ,अजिंठा रोड वरील काही दुकामदार,व्यापारी व रिक्षा व्यावसायिकांनी ,व लहान मोठ्या कामगारांनी या कचऱ्याचे व पाण्याचे विल्हेवाटी व नियोजन करण्यासाठी विनंती केली. यावर ,मा भोळे यांनी सुद्धा जिल्ह्यातील मनपा व्यवस्थापन विभाग व आयुक्त तथा साफसफाई कंत्राटदारांना फोनवर सूचना केल्या ,व लवकरारात लवकर या बाबत गांभीर्य घेऊन संबंधित ठिकाणच्या तक्रारीचा निपटारा करावा असे सूचना वजा आदेश दिले.सत्यमेव जयतेच्या प्रतिनिधींनी या विषयी सविस्तर माहिती जाणून घेत,येथील दुकानदार व कामगार लोकांना मा राजूमामा भोळे यांच्या माध्यमातून तक्रारी ची दखल घेण्यासह ती मागणी पूर्ण होण्याच्या शास्वती सह आज सुखद धक्का दिला.