नाशिक(प्रतिनिधी)- कृती फाऊंडेशन, नाशिक शाखा यांच्यामार्फत आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक निर्देशांनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंतरिक शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अबाधित व वाढविण्याच्या तसेच मानवी शरीरावर होणाऱ्या २०२ पेक्षा जास्त संभाव्य आजारांवर प्रतिकारक व प्रभावी उपाय या उद्देशाने नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, विल्होळी, नाशिक येथे संपूर्ण नाशिक शहरातून गोळा होणारा घनकचरा याचे संकलन व विल्हेवाट करणारे, सर्वसाधारण परिस्थितीमध्ये समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणारे व कोरोना विषाणूच्या भयंकर, भयानक व भयावह परीस्थितीत आपल्या जीवाची, आरोग्याची, काळ, वेळ, भूक, तहान यांची तमा न बाळगता आपले कर्तव्य निरंतर व रोजच्या रोज बजावत असणारे सफाई कर्मचारी बांधव / भगिनी तसेच घनकचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीवरील कार्यरत सफाई कर्मचारी, चालक, वाहक, सुरक्षा रक्षक, कोविड सैनिकांना प्रायोगिक तत्त्वावर श्री श्री तुळशी रस व श्री हळदी रस याचे वाटप करण्यात आले.
गेल्या ४-५ वर्षांपासून कृती फाउंडेशनने अनेक क्षेत्रात नानाविध समाजोपयोगी उपक्रम राबविलेले आहेत व ते समाजाने सर्व स्तरावर पारखलेत आणि म्हणूनच आज कृती फाउंडेशनला समाज मान्यता मिळालेली आहे. कोरोना विषाणूच्या भयंकर, भयानक व भयावह परीस्थितीत आपल्या कौटुंबिक, सामाजिक व कार्यालयीन जबाबदाऱ्या सांभाळून लॉक डाऊन च्या काळात आजपावेतो गरजूंना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूं, आरोग्यवर्धक औषधे तसेच शासकीय कर्तव्यावर हजर असलेले कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर इ. विविध वस्तू वाटप करून आरोग्य व कोरोना विषाणू संदर्भात घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती केली. कृती फाउंडेशनच्या मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण सारख्या महानगरातील तसेच नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे, चाळीसगाव नगरातील सर्व सभासद / कार्यकर्त्यांनी मदतीचा हात देऊन कार्य पूर्णत्वास नेले आहे. अत्यंत प्रतिकूल व संवेदनशील परीस्थितीत हे काम उभं राहीलयं. सदर उपक्रम कृती फाउंडेशनचे सचिव जी टी.महाजन, डी. टी. महाजन, शेखर महाजन, अध्यक्ष प्रशांत महाजन, कार्याध्यक्ष व पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, यांच्या मार्गदर्शनाने नाशिक शाखेचे भाग्यश्री महाजन, अजय महाजन यांच्या मार्फत घेण्यात आला. सदर उपक्रमास लोक एकजुट सामाजिक संस्था संस्थापक शिवाजी सोनवणे, अपेक्षा अहिरे, वर्षा कोतकर यांचे सहकार्य व उपस्थिती होती.