<
भडगांव : दि. ९ /८/२०१९ रोजी तहसिलदार यांना विनाअनुदानित उच्च माध्यमिक तत्वावर कार्यरत शिक्षक व असणाऱ्या शिक्षीका यांनी निवेदण देण्यात आले. या निवेदनात शिक्षक व शिक्षीका यांच्या आठ प्रमुख मागण्या होत्या.
इतर मागण्या
1)२६ फेब्रुवारी २०१४ च्या शासन निर्णयाप्रमाणे विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांना अनुदानाची प्रचलित धोरण प्रमाणे अमंलबजावणी व्हावी.2) विना अनुदानित उच्च माध्यमिक तत्वावर कार्यरत असणार्या शिक्षकांच्या सेवा पुस्तिका वरिष्ठ लेखा अधिकारी यांच्याकडून सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार प्रमाणित करण्यात याव्यात. 3) मागास वर्ग कक्ष कार्यालयामधिल बिंदुनामावली ची रोस्टर संबधित प्रकरणे विशेष प्राधान्य देण्यात यावे. 4) शिक्षकांच्या नियुक्ती दिनांकपासून सुधारित वैयक्तिक मान्यता देण्यात याव्यात.5) जुन्या नियुक्त शिक्षकांच्या सेवा लक्षात घेता त्यांच्या सेवेचा सेवाज्येष्ठता मध्ये समावेश करण्यात येवून त्यांना लाभ मिळावा.6) सरल पोर्टल आॅनलाईन सुरू करून शिक्षक कर्मचारी यांची माहिती भरणे करता मा.शिक्षणाधिकारी यांना आदेश होण्याबाबत7) विभागातील शालार्थ आय.डी.ची प्रकरणे तात्काळ सोडविण्यासाठी आपल्या स्तरावर संबंधितांना सुचना देणेबाबत8) अंशतः अनुदानित शिक्षकांना व त्यांच्या कुटूबांना वैद्यकिय सेवा सुविधेचा लाभ देण्यात यावा.
अशा मागण्या प्रमुख होत्या. या शिक्षकांमध्ये काही शिक्षकांचे वय 45 ते 50 वर्षे झाले असून अजुनही त्यांना न्याय मिळाला नाही. या निवेदनाद्वारे जर आता हा प्रश्न मिटला नाही तर 18 वर्षापासून विनावेतन करत असलेली नोकरी सोडाव्या लागतील व त्यामुळे लाखो शिक्षकांचे कुटूंब उद्धस्त होतील. शिक्षकांचा आता अंत पाहू नका आमचा प्रश्न न सुटल्यास तिर्व अंदोलन उभे राहिल असे विभागिय सचिव निलेश पाटील यांनी नमुद केले. शिक्षकांच्या बेमुदत संपामुळे विद्यार्थी व विद्यार्थीनींचे शैक्षणिक नुकसान होत असून शासन दरबारी यांचा त्वरीत निर्णय व्हावा यासाठी विद्यार्थींनी प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे.