उस्मानाबाद (सत्यमेव जयते न्युज):- उस्मानाबाद येथील 10 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून 7 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित (Inconclusive) आले असून एका व्यक्तीचा अहवाल परिपूर्ण न आल्यामुळे रद्द (reject)करण्यात आला आहे. दोन पॉझिटिव्ह व्यक्तीपैकी एक कळंब तालुक्यातील पाथर्डी व दुसरी व्यक्ती परंडा तालुक्यातील कुकडगाव येथील असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे २८ रुग्ण आढळले असून ६ जण ठीक होऊन घरी परतले आहेत तर २२ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.