फैजपूर(किरण पाटील)- कोरोना महामारीच्या ह्या काळात प्रभावी उपाय योजना करण्यात, प्रशासकीय यंत्रणा कार्यक्षमपणे राबविण्यास आणि सर्व सामान्य जनतेला पुरेशी मदत पोहोचविण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. त्याचा जनतेच्या वतीने निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य तर्फे राज्य सरकार चा निषेधार्थ पूर्व घोषित महाराष्ट्र बचाव आंदोलन द्वारा दि.२२ मे २०२० शुक्रवार रोजी शहरातील श्रीराम मंदिर जवळ फैजपूर भाजपा तर्फे निषेधार्थ सोशल डिस्टनसिंग चे पालन करून सरकार विरोधात काळे माक्स, काळे कपडे परिधान करून निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकार विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. ह्या संकटकाळात देखील ह्या सरकारच्या अपयशांचा पाढा वाचावा तेवढाच कमी आहे. जनतेचा आवाज बनून ह्या सरकारच्या मुस्कटदाबीविरुद्ध आवाज उठवण्यात आला. यावेळी निदर्शनकर्त्यात शहराध्यक्ष अनंता नेहेते, ता उपाध्यक्ष नितीन नेमाडे, सरचिटणीस संजय सराफ, युवा मोर्चा उपाध्यक्ष दीपक होले, अनिरुद्धभाऊ सरोदे, जितेंद्र भावसार, दिव्यांग सेनाचे योगेश चौधरी, श्याम भंगाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.