फैजपूर(किरण पाटील)- वारकरी साप्रदयाचे आराध्यदैवत श्री पाडुरंग रायाची आषाढि वारी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी भरत असते अनेक पिढ्यानपिढ्या पायी दिंडीचे माध्यमातून लाखो वारकरी पायी चालत भक्ती सुखाचा आनंद घेत पंढरपूर येथे येऊन ही उपासना व साधना परंपरा जोपासली आहे यावर्षी कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रसार् व मानवी महामारी चे आलेले संकट लशात घेता व जनहितार्थ गर्दी होऊ नये म्हणून नेहमी प्रमाणे वारी भरणे अश्यक्य वाटत आहे. परंतु वारी परंपरा जोपासणे व आपली साधना खंडित न होता अखंडित राहणे हे सुद्धा संप्रदाचे दृष्टीने महत्वाचे आहे याकरिता शासनाने मध्यम मार्ग काढून द्यावा. केवळ पायी दिंडीचे परंपरचे प्रत्येकी १० प्रतिनिधी यांना आषाढ शु चतुर्थी ते पौर्णिमा या दहा दिवसाचे वारीचे कालावधीत वेळ दिवस निश्चित करून द्यावा. त्यावेळेत वारकरी पंढरपूर येथे आपापले वाहनाने जाऊन सर्वांचे वतीने वारी करून येतील याबाबत जिल्हावार नियोजन जिल्हाधिकारी यांचे मार्फत रीतसर सर्व अटी शर्ती चे पूर्तता करून परवानगी द्यावी वारकरी प्रशासनाचे सर्व नियम पाळतील. दहा दिवस व प्रत्येक दिवसांत सोळा तास यानियोजना नुसार पंढरपूर येथे कोणतीही गर्दी होणार नाही शासनाने वारकरी समुदायाच्या भावनांचा व परंपरांचा आदर राखून तात्काळ नियोजन जाहीर करावे व रीतसर परवानगी मिळावी अशी विनंती दिगंबर महाराज वारकरी पंढरपूर मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे फैजपूर यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. Attachments area