<
जळगांव(प्रतिनीधी)- पारितोषिकांची ही कोटीच्या कोटी उड्डाणे सोडली तर प्रतिष्ठेच्या “आंतरराष्ट्रीय” पुरस्कारांकडेच सर्वांचे लक्ष लागलेलं असतं. अशातच कृती वेल्फेअर (ऑस्ट्रेलिया) व कृती फाऊंडेशन (भारत) यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच “आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२०” यासाठी प्रस्ताव मागविण्यात येणार असल्याचे कृती वेल्फेअर ऑस्ट्रेलियाचे शेखर महाजन व कृती फाऊंडेशन भारताचे अमित माळी यांच्यावतीने कळविण्यात आले आहे.
यात व्यक्ती किंवा संस्थेच्या माध्यमातून वर्षभरात केलेल्या कार्याचा तसेच महत्वाचे म्हणजे कोरोना विषाणू महामारीच्या काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन सदर आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी लवकरच संपूर्ण जगभरातून प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. सदर पुरस्काराचा नामांकन अर्ज लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. साहजिकच साऱ्यांच लक्ष लागलंय ते या वर्षीचा कृती वेल्फेअर व कृती फाऊंडेशनचा ‘’आंतरराष्ट्रीय पुरस्कार’’ कुणाला?