<
उस्मानाबाद :- जिल्हयातील 47 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 35 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 06 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 06 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत. यामध्ये उमरगा ३, परंडा १ आणि जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद २ असे ६ रुग्ण आढळले आहेत. तसेच जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३५ झाली असून ६ जण बरे होऊन घरी परतले आहेत तर २९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.