<
कळंब, प्रतिनिधी
उद्या दि.25/05/2020 रोजी मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान ईद हा सण साजरा होत आहे. परंतु सद्यस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यात करोना या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळून आले असून, करोना हा संसर्गजन्य आजार असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात गर्दीच्या/सार्वजनिक ठिकाणावर कार्यक्रमाचे आयोजन केल्यास करोना विषाणूंचा मोठया प्रमाणावर फैलाव होवू शकतो, उस्मानाबाद जिल्ह्यात फौजदारी प्रक्रीया संहिता 1973
चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहेत. त्यामूळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर गर्दी करु नये. तसेच पवित्र रमजान ईद करिता
ईदगाह मैदानावर अथवा इतर ठिकाणी नमाज अदा न करता आपापल्या घरीच राहुन व शारीरीक अंतर ठेवुन नमाज अदा करण्यात यावी. तसेच पवित्र रमजानच्या शुभेच्छा देताना नागरिकांनी एकमेकांना गळाभेट अथवा हस्तांदोलन करुन शुभेच्छा न देता रमजान ईद अत्यंत साधेपणाने व शारीरीक अंतर ठेवुन साजरी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंढे यांनी केले