<
कळंब, प्रतिनिधी | हर्षवर्धन मडके
‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यात दररोज साधारण पाच हजार रूग्णांना रक्ताची आवश्यकता असते. विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रूग्णांना रक्ताची गरज असते. कोरोनामुळे नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे. शिवाय, उन्हाळी सुट्टीतील अनेक मोठे रक्तदान शिबिर कोरोनामुळे आयोजितच केले गेले नाहीत. त्यामुळे राज्यात अवघ्या १५-२० दिवसांचाच रक्त साठा शिल्लक असल्याची माहिती स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. उस्मानाबाद जिल्हा शासकिय रूग्णालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमीत ठाकरे यांच्या २८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून धाराशिव जिल्हा मनसेच्या वतीने या कोरोना आजाराच्या काळात जिल्ह्यातील रूग्णांना रक्तांचा पुरवठा कमी पडू नये यासाठी रक्तदान शिबिर घेण्यात आले.यावेळी या रक्तदान शिबिराची सुरूवात मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम यांनी स्वत: रक्तदान करून केली.या रक्तदान शिबिरास जिल्ह्यातील शिक्षक सेनेचे राहुल बचाटे, कुंभार सर, लोहारा विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष विवेक बनसोडे, गणेश अवताडे, केतन नाईकनवरे, अश्रू अवताडे, महादेव शेळवणे, पांडूरंग लोखंडे, अविनाश ढगे, यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मनसे कार्यकर्त्यांनी व पदाधिका-यांनी रक्तदान करून चांगला प्रतिसाद दिला. यावेळी उस्मानाबाद जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.राजाभाऊ गलांडे, डाॅ.गोरे मॅडम, जिल्हा संघटक अमरराजे कदम, जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कोठावळे, जिल्हा सचिव दादा कांबळे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष राहूल बचाटे, उपजिल्हाध्यक्ष बबन वाघमारे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. या रक्तदान शिबीरात सर्वांनी सोशल डिष्टन्सिंगचा, मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करूनच रक्तदानात जास्तीत जास्त मनसैनिकांनी सहभाग नोंदवला गेला होता. या रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा संघटक अमरराजे कदम यांनी केलेले होते तर विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुरज कोठावळे, तुळजापूर शहराध्यक्ष धर्मराज सावंत, मनसे चित्रपट सेनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी गोरे, जिल्हा सचिव नागेश मोरे, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश ठोंगे, कळंब तालुका उपाध्यक्ष बालाजी निरफळ, तन्मय वाघमारे, शरद गालत, रत्नदिप लोमटेसह असंख्य मनसे सैनिक हजर राहून सहकार्य केले.