<
फैजपूर(किरण पाटील)- फैजपूर सह परिसरात साध्या पद्धतीने लॉकडाऊन असल्यामुळे व सोशल डिस्टेंसिंग चे पालन करून रमजान ईद साजरी करण्यात आली. गेल्या 80 वर्षात पहिल्यांदाच २०२० मध्ये कोरोना महामारी मुळे मुस्लिम बांधव एकमेकांना फक्त दुरूनच रमजान ईद मुबारक निमित्त शुभेच्छा देत होते. लहान मुला- मुलीना सुध्दा बाहेर न जाता घरात ऐकमेका ना शुभेच्छा दिल्या. फैजपूर शहरात प्रत्येक वाड्यात हजीरा मोहल्ला, इस्लामपूरा, मिल्लत नगर, ताहानगर, पठाण वाडी, कुरेशी वाडा या सह इतर ठिकाणी मुस्लिम बांधवानी घरातच राहून रमजान ईदची नमाज अदा केली. व अल्ला कडे कोरोना महामारी पासून आमचे व भारत देशला मुक्ती साठी विशेष प्रार्थना केली. तसेच जेष्ठ नागरिकांनी रमजान ईद निमित्त बोलतांना म्हटले की आमच्या आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग आहे. कोरोना महामारी मुळे जग हादरले आहे. लहान लहान मुले सुध्दा या महामारी मुळे भयभीत झाले आहे. हे लहान मुले सुध्दा सोशल डिस्टेंसिंग चे पालन करून ऐक मेकांना ईद मुबारक च्या शुभेच्छा देत आहे. रमजान ईद मध्ये नवीन कपडे, बूट, चप्पल घाललेले कमी दिसत होते. अशी महामारी परत येऊ नये अशी प्रार्थना करीत होते. रमजान ईदची हार्दिक शुभेच्छा देताना शरीफ मलक, शरीफ मलिक सर, आबिद मलिक, समाजसेवक हाफिस, अनस शरीफभाई, फारूक मन्यार, कलाम खा मन्यार डॉ. जलील, राईस मोमीन या सह आदी मान्यवरांनी रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.