<
उस्मानाबाद :- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 26 मे 2020 रोजी उस्मानाबाद जिल्हयातील एकुण 77 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 05 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 11 व्यक्तीचे अहवाल प्रलंबित आहेत. परांडा कुकडगाव येथील तीन रुग्ण मुंबई रिटर्न, पॉसिटीव्ह आहेत. तसेंच कळंब येथील भातशिरपूरा येथील एक मुंबई रिटर्न आहे, तसेच omerga येथील बेडगा येथील एक रुग्ण पॉसिटीव्ह असून मुंबई रिटर्न आहे.तसेच आधीच्या ५ प्रलंबित अहवालातील ३ पॉझिटिव्ह तर दोन inconclusive आले आहेत. यामध्ये कळंब तालुक्यातील रुग्णाच्या संपर्कातील १ व्यक्ती पॉझिटिव्ह , उस्मानाबाद मधील पापनाश नगर, मुंबई रिटर्न तर एक तेर पुणे रिटर्न. तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४३ झाली असून ८ जण बरे होऊन घरी परतले आहेत तर ३५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.