<
उस्मानाबाद,दि. 27(जिमाका):- राज्य शासनाने कोरोना विषाणूचा कोविड-19 प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे.यानुसार कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून एका ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील एफएल-II, एफएलबीआर- II, सीएल- III,व एफएल- III,या किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्यांना सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते दुपारी 2.00 या वेळेत सिलबंद बाटलीतून मद्य विक्रीची परवानगी दिलेली आहे.राज्य शासनाने लॉकडाऊन कालावधी दि.17 मे 2020 ते 31 मे 2020 पर्यंत वाढविला असून या संबंधी विहीत केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार राज्यात समान कार्यपध्दती अवलंबण्याच्या दृष्टिने आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांनी वाचले पुढील मार्गदर्शक तत्वे विहित केलेली आहेत.
किरकोळ मद्यविक्री दुकाने.(एफएल-2/एफएलबीआर-2/एफएल-3/सीएल-3)1.फक्त उपरोक्त अनुज्ञप्ती प्रकार पुढील निकषांच्या आधारे चालू करता येतील व सदर अनुज्ञप्ती प्रकारातून फक्त सिलबंद मद्यविक्री करण्यास परवानगी राहील.ग्रामीण भागातील मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने सुरु करता येतील.तर शहरी भागात महानगरपालिका व नगरपरिषद हद्दीमधीलमॉल्स,बाजार संकूल व बाजारातील मद्यविक्री दुकाने चालू करता येणार नाहीत.त्याच प्रमाणे कंटेनमेंट झोन वगळून शहरील भागातील सर्व प्रकारची स्वतंत्र (Stand alone)किरकोळ मद्यविक्रीची दुकाने,कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील उक्त अनुज्ञप्ती सुरु करता येतील.
2.सीलबंद पिण्याचा प्रमाणित परवाना असल्याशिवाय मद्यविक्री होणार नाही. व रांगेतही उभे राहता येणार नाही.तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक यांना Social Distancing चे पालन व गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नेमणूक करण्याची जबाबदारी संबंधित कार्यक्षेत्रिय निरीक्षक व दुय्यम निरीक्षक यांची राहील. 3. सीलबंद मद्य विक्री करणा-या मद्य विक्री करणाऱ्या दुकानांसमोर 5 पेक्षा अधिक ग्राहक एकावेळी असता कामा नयेत व दोन ग्राहकांमध्ये किमान 6 फुट अंतर असणे अनिवार्य राहील,याकरिता दुकानासमोर सहा फुटावर वर्तुळ आखून घ्यावीत.प्रत्येक ग्राहकाने मास्क वापरणे बंधनकारक राहील.4.संबंधित अनुज्ञप्तीधारकांने सर्व नोकरांची / ग्राहकांची थर्मल स्कॅनिंग करावी व ज्या नोकरास/ ग्राहकांस सर्दी,खोकला व ताप यासारखी लक्षणे आहेत.त्यांस अनुज्ञप्तीमध्ये प्रवेश देऊ नये.5.दुकान व सभोवतालचा परिसर दर दोन तासांनी निर्जंतूकीकरण करणे आवश्यक राहील.तसेच दुकानात येणा-या ग्राहकांसाठी हँड रब सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधीत अनुज्ञप्तीधारकाची राहील.6.आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क्,महाराष्ट्र राज्श्,मुंबई यांचे पत्र क्र.एफएलआर 1020/कोविड-19/सात,दि.4 व 13 मे 2020 व 19 मे 2020 मधील सर्व सूचनांचे पालन करणे अनुज्ञप्तीधारकांना बंधनकारक असेल.7.भारत सरकार,गृह मंत्रालय आदेश क्र.40-3/2020-डीएम-1(ए)दिनांक 1 मे 2020 मधील परिशिष्ट-1 नुसार कामाच्या ठिकाणी पाळावयाची मार्गदर्शक तत्वे किरकोळ विक्रेत्यांना पाळणे आवश्यक राहील.8.अशा किरकोळ मद्यविक्री मद्यविक्री दुकानांमध्ये लॉकडाऊनबाबतची मार्गदर्शक तत्वे पाळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नेमण्याची जबाबदारी संबंधित अनुप्तीधारकाची राहील.9.वर नमूद सर्व अनुज्ञप्त्या सीलबंद मद्यविक्रीसाठी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00वाजेपर्यंत कार्यरत राहतील.10.मुंबई विदेशी मद्य नियम 1953 च्या नियम 70 (डी) अन्वये विहित केलेली मद्य बाळगणे/खरेदी करणे याच्या क्षमतेचा भंग होणार नाही याची संबंधित मद्यविक्रेत्यांने आवश्यक काळजी घ्यावी.11.कोणत्याही परिस्थितीत उघडलेल्या मद्य विक्रीच्या आस्थापनांमध्ये मद्य प्राशन होणार नाही याची दक्षता घ्यावी व अशी बाब आढळल्यास प्रचलित कायद्यातील तरतुदींनुसार कडक कारवाई करण्यात येईल.
12.अशा कोणत्याही दुकानाने सदर मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्यास त्याचे दुकान तात्काळ बंद करण्यात येईल व त्यांच्याविरुध्द प्रचलित कायद्यांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.13.अनुज्ञप्तीधारकाने दुकानासमोर Barricading लावून घ्यावेत.
14.अनुज्ञप्तीधारक /नोकरनामाधारक यांनी हातमोजे चा वापर करावा.15.प्रत्येक सिलबंद किरकोळ मद्यविक्री करणा-या दुकानाच्या प्रवेशद्वारावार दर्शनी भागात सहजरित्या दिसेल असा फलक लावण्यात येईल.सदर फलकावर पुढील तपशील छापण्यात येईल.अ)दुकानाच्या कामाकाजाच्या सुधारित वेळा.ब)एका वेळी दुकानासमोर 5 पेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत.क) Social Distancing व Mask चा वापर अनिवार्य आहे.ड) सर्व ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल.ज्यास सर्दी,खोकला व ताप यासारखी लक्षणे आहेत, अशा व्यक्तींनी दुकानात प्रवेश करु नये.इ) दुकानात मद्य प्राशन करता येणार नाही.फ)परिसरात थुंकण्यास सक्त मनाई आहे.ग)दुकानदाराकडून,ग्राहकांकडून नियमभंग झाल्यास त्यांचेविरुध्द प्रचलित कायद्यान्वये कडक कारवाई केली जाईल.16.कोणतीही खाद्यगृह, मद्यविक्री आस्थापना अथवा केवळ बसून पिण्याची सोय असलेली आस्थापनामधून मद्यविक्री होणार नाही.17.आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क,मुंबई यांचे पत्र क्र.एफएलआर.1020/कोविड-19/सात दि.19 मे 2020 मधील मार्ग दर्शक तत्वे.1.सदरचे आदेश ज्या कार्यक्षेत्रात मद्यविक्री अनुज्ञप्ती कार्यरत रहाण्यासाठी संबंधित प्राधिकृत अधिका-याने परवानगी दिली आहे.त्या कार्यक्षेत्रात एफएल-3 अनुज्ञप्तीकरिता लागू राहतील,कोणत्याही कंटेनमेंट झोन (प्रतिबंध क्षेत्र)मधील अनुज्ञप्ती कार्यरत राहणार नाही.2.अनुज्ञेय असलेल्या ठिकाणी सदर अनुज्ञप्ती कार्यरत राहण्याच्या वेळा सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत ठेवाव्यात.3.सदरची सवलत एफएल-3 अनुज्ञप्तीधारकास त्यांच्याकडील दि.20 मार्च 2020 अखेरीस असलेला मद्यसाठा संपेपर्यंत किंवा लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत यापैकी जे आधी होईल तो पर्यंत लागू राहतील.4.एफएल-3 अनुज्ञपतीधारकास त्याच्या अनुज्ञतीतील शिल्लक मद्यसाठा सीलबंद बाटलीतून फक्त off Consumption साठी परवानाधारकास विक्री करता येईल.
5.मद्यसाठा एमआरपी दराने विक्री करणे क्रमप्राप्त राहील.व त्यावरील विक्रीकर (Composition Tax ) रितसर भरणे बंधनकारक राहील. 6.एफएल-3 अनुज्ञप्तीधारकांनी परवानधारकास अनुज्ञप्तीच्या ठिकाणी मद्यप्राशन करण्यास देऊ नये.अन्यथा संदर्भिय आदेशाचा भंग मानला जाईल.7.संबंधीत एफएल-3 अनुज्ञपतीधारक विशेष पासान्वये बियरचा साठा एफएल/बीआर-2 अनुज्ञप्तीधारकांस एक वेळा विक्री करु शकेल.परंतु त्याकरिता एफएल/बीआर-2 अनुज्ञप्तीधारकांची मंजूरी असणे आवश्यक राहील.8.एफएल-3 अनुज्ञप्तीधारकास त्याच्या अनुज्ञप्तीतून शिल्लक मद्यसाठा सीलबंद विक्रीसाठी सदर परवानगी असून त्यांना नव्याने मद्यसाठा,हे आदेश लागू असे पर्यंत खरेदी करता येणार नाही.9.अधीक्षकांनी संबंधित एफएल-3 अनुज्ञप्तीधारकाकडील नमूना एफएलआर-3 व एफएलआर-3 ए नोंदवहयांतील दि.24 मार्च 2020 रोजीच्या शिल्लक मद्याच्या नोंदी प्रत्यक्ष मद्य साठयाबरोबर तपासून घ्यावयाच्या आहेत व अनुज्ञप्तीधारकास तेवढयाच मद्यसाठयाची विक्री करता येईल.मद्यसाठी विक्री होऊन संपल्यानंतर संबंधित राज्य उत्पादन शुल्क अधिका-यास कळविण्याच्या सूचना अनुज्ञप्तीधारकास देण्यात याव्यात.10.बिअरचा साठा मुदतबाहय झाला असल्यास अथवा त्याची प्रत खराब झाली असल्यास त्याची विक्री अनुज्ञप्तीधारकांनी करु नये.11.त्यांच्या कार्यक्षेत्रातील एफएल-3 अनुज्ञप्तीधारक नमूना एफएल-1,एफएल/डब्ल्यू-1 अनुज्ञप्तीकडून नव्याने मद्य खरी करणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी.तशा सुचना एफएल-1 च्य प्रभारी अधिका-यास देण्यात याव्यात.12.संबंधित एफएल-3 अनुज्ञप्तीधारकाकडे शिल्लक असलेल्या मद्यसाठयाचीच विक्री करणे बंधनकारक आहे.कोणत्याही परिस्थितत एफएल-3 अनुज्ञपतीधारकांने घाऊक मद्यविक्रेत्याकडून अथवा एफएल-2 अनुज्ञप्तीधारकाकडून विना परवाना आणणार नाहीत.याची दक्षता घ्यावी.एफएल-2 अनुज्ञपतीमधून मद्यसाठा आणल्याचे दिनर्शनास आल्यास,प्रकरणी चौकशी करुन संबंधित एफएल-3/एफएल-2 अनुज्ञप्ती विरुध्द नियमानुसार कडक कारवाई करण्यात यावी.13.मद्यविक्री करतांना कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्व खबरदारी घेणे अनुज्ञप्तीधारकाची जबाबदारी राहील.एफएल-3 अनुज्ञप्तीधारकास यांच्याकडे काम करणा-या कामगांराना आपत्ती निवारण,चोख स्वच्छता राखणे व कोविड संदर्भात इतर बाबतीत उदा.आरोग्य सेवू ॲपचा वार याबाबत सखोल प्रशिक्षण देण्याची जबाबदारी अनुज्ञपतीधारकाची राहील.
14.एफएल-3 अनुज्ञप्तीधारकाने गर्दी,संपर्क व संसर्ग टाळण्याच्या दृष्टीकोनातून मद्यखरेदीसाठी येणा-या ग्राहकांमध्ये व अनुज्ञप्तीच्या ठिकाणी असणा-या व्यक्ती /कामगारांमध्ये Social Distancing , Mask व वेळोवेळी Sanitization बाबत शासनाच्या निर्देशंचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील.15. यापैकी कोणत्याही शर्तीचा भंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 साथीचे रोग कायदा,1897,भारतीय संहिता कलम 188 व महाराष्ट्र दारुबंदी कायदा मधील तरतुदीन्वये कारवाईसंबंधित अनुज्ञपतीधारक पात्र राहील. वरील मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्याच्या अटींवर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या अधिकारानुसार व या विभागाच्या समक्रमांकाच्या दिनांक 18 मे 2020 रोजीच्या आदेशात अंशत:बदल करुन दिनांक 25 मे 2020 पासून सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वा.पर्यंत उस्मानाबाद जिल्हयातील मद्यविक्री अनुज्ञप्तया चालू करण्याबाबत खालीलप्रमाणे आदेश देत आहेत.अनुज्ञप्तीचा प्रकार,अनुज्ञप्ती कार्यरत राहण्याची वेळ,अनुज्ञप्ती कार्यरत राहण्याचा दिनांक/दिवस,अनुज्ञप्ती कार्यरत राहण्याचे क्षेत्र पुढील प्रमाणे आहे.1. एफएल-II,वेळ 9 ते 5 सर्व दिवस 2. एफएलबीआर-II, वेळ 9 ते 5 सर्व दिवस 3.सीएल-III, वेळ 9 ते 5 सर्व दिवस 4.एफएल- III, वेळ 9 ते 5,दिनांक 20 मार्च 2020 रोजी अनुज्ञप्तीमध्ये असणारा मद्यसाठा विक्री होईपर्यंत किंवा लॉकडॉऊन संपेपर्यंत या पैकी जे आधी घडेल तो पर्यंत.सर्व अनुज्ञप्ती कार्यरत राहण्याचे क्षेत्र संबंधित क्षेत्रात उपविभागीय अधिकारी यांनी वेळोवेळी जाहिर केलेले प्रतिबंधित क्षेत्र वगळून संपुर्ण उस्मानाबाद जिल्हा या मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 च्या कलम 51 ते 60 अन्वये तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये गुन्हा दाखल होण्यास पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल.त्याच प्रमाणे अशा व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्र दारुबंदी कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईस पात्र असतील. या आदेशाचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास अनुज्ञप्ती तात्काळ रद्द करण्यात येईल.