<
जळगाव – (धर्मेश पालवे) आज ९-८-१९ ला नांदेड येथे एरंडोल चे प्राताधिकारी श्री विनय गोसावी आणि धरणगाव बीडीओ श्रीमती स्नेहा कुडचे यांनी गिरणा नदीची पूरपाहाणी केली.ग्रामपंचायत बैठकीनंतर गुलाबवाडीतील नागरिकांच्या विनंतीवरून बीडीओ कुडचे यांनी गुलाबवाडीची पाहाणी केली असता,तेथील अत्यंत वाईट परिस्थिती पाहिली.साठ घरांना अजूनही रस्ता नाही. गटारीतून चालत जावे लागते.पाणीपुरवठा चे नळ गटारीत बुडालेले विदारक चित्र पाहिले.गुलाब खुलण्यासाठी कदाचित हा चिखल जतन करून ठेवला असावा.
किंवा चाळीस वर्षापासून गुलाबराव नावाचे तीन आमदार यांनी निवडून दिले.म्हणून पुन्हा नवीन चौथा गुलाबराव आमदार बनण्यासाठी हा चिखल जतन केला असावा.
गुलाबवाडीला ” इंडियन हेरीटेज ” म्हणून जतन तर केले नसावे?
या कुटुंबांना मागील ३० वर्षापासून झेडपी ने सुविधा नाकारल्या.कारण हा भाग पाणबुडीत ,पूरग्रस्त क्षेत्रात आहे. पुनर्वसन खात्याने ही यांचे पर्यायी जागेवर पुनर्वसन केले नाही. पुनर्वसन ही नाही, सुविधा ही नाही, अशी बिकट कैचीत सापडलेले लोक जळगाव जिल्हा जागृत जनमंच चे शिवराम पाटील यांचेकडे मदतीची मागणी केली.डिसेंबर२०१८ मधे १० दिवस झेडपी समोर उपोषण केल्यावर नांदेड ग्रामपंचायत मालकीची ३०गटाची ७२ हेक्टर जमीन पैकी एक गट नंबर ३६८ हा ग्रामपंचायत ने दिला.त्याची परवानगी कलेक्टर कडून मिळाली. पण मोजमाप चे काम भूमिअभिलेख खात्याकडे प्रलंबित आहे.मोजणी फी साडेदहा हजार रुपये ग्रामपंचायत ने भरले.अद्याप मोजणी न केल्याने घरकुल जागेचे अलौटमेंट अडकलेले आहे.
शिवराम पाटील यांनी बीडीओ, तहसीलदार,जिल्हाधिकारी (महसूल )यांचेकडे पाठपुरावा केला.पण अजून टेबलावर कागद उडत आहेत आणि भूमिअभिलेख चे कर्मचारी मी नोकरीवर नाही, मी रजेवर आहे,साहेब नाहीत अशी कारणे सांगून वेळ मारून नेत आहेत.
आता नवीन बीडीओ कुडचे आणि नवीन प्रांत गोसावी यांनी पूरग्रस्तांना आश्वासन दिले कि,ताबडतोब जागेची मोजणी करून घरकूल साठी जागा अलौटमेंट करू.
३० वर्षापासून चिखल तुडवत ही कुटुंबे कसेतरी युगाडा,केनिया, सोमालिया चे जीवन जगत आहेत.येथील झेडपी सदस्य कोणतीही मदत करीत नाहीत.आम्ही ही फुकट मत दिले नाही.म्हणून बोलता येत नाही.तीन वेळा निवडून दिलेले आमदार महोदय,फक्त आश्वासनाची पोटली आणून दाखवतात.कधी आमदार, कधी बीडीओ, कधी कलेक्टर ,कधी सीईओ यांचेकडे सतत फिरून ” चिलम तमाखू उस घर “असा खेळ चालू आहे.
“देश आगे जा रहा है “या मा. नरेंद्र मोदींच्या शब्दावर विश्वास ठेवून जीवन आणि मरण यातील खाईत गुलाबवाडीतील बायामाणसे झोके खात आहेत, जीवनाचा दोर तुटून जाईपर्यंत.