<
रावेर(प्रतिनीधी)- रोजी कुंभारखेडा,सावखेडा या परिसरात कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास ताठे यांच्या हस्ते आयुष मंत्रालयाद्वारे प्रमाणित कोव्हीड – १९ विरोधात प्रतिबंधात्मक आणि रोगप्रतिकारक शक्ती वर्धक होमिओपॅथिक औषधी आसॅनिकम अल्बम – ३० यांचे मोफत वितरण सावखेडा, कुंभार खेडा या परिसरातील वयोवृद्ध महिला, शेतमजूर, गोरगरीबांना या गावातील सुमारे तिनशे जणांना मोफत वाटप करण्यात आले. तसेच ही औषधी घेण्याचीही पध्दत व सविस्तर माहिती श्री विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी यांनी संबंधितांना दिली, व कोणालाही श्वास घेण्यासाठी अडचणी येत असेल, सर्दी खोकला ताप, अशक्तपणा, घशात खवखव, डोकेदुखी इ लक्षणेही वाटल्यास वा आढळून येतं असल्याचं जाणविल्यास लगेचच उपचार सुरू करावेत, व जवळील आरोग्य केंद्र वा आरोग्य सेवक व गावातील सरपंच तलाठी ग्रामसेवक यांना कळवावे, व अशा व्यक्तीनी घाबरून न जाता, बचावात्मक पवित्रा घेतला पाहिजे. तसेच महाराष्ट्र शासन यांनी कोरोना बाधित रूग्ण यांना मोफत उपचार पद्धती योजना नुकतीच सुरू केली आहे, याचेही मार्गदर्शन केले. नेहमी हात स्वच्छ साबणाने धुवावेत, मास्क वापरावे किंवा रुमालाने नाक, तोंड व्यवस्थित बांधावे, व सोशल डिस्टींगशनचे पालन नेहमीच करावे, असे आव्हान विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी यांनी सर्वसामान्य जनतेला केले. तसेच सावदा येथील विलास यशवंतराव पाटील, ज्ञानाई गुरुकुल यांच्या कडून सदर औषधी उपलब्ध करून देण्यात आली.