<
जामनेर/प्रतिनिधी–अभिमान झाल्टे
कोविड केयर सेंटर पळासखेडा जामनेर येथे मृत पॉझीटीव्ह महिलेच्या संपर्कातील 13 व्यक्तींना दाखल करण्यात आले आहे.
आज रोजी मा.तहसीलदार एवं तालुका दंडाधिकारी अरुण शेवाळे जामनेर यांच्या मार्गदर्शनाखाली व नोडल ऑफिसर डॉ.विनय सोनवणे यांच्या अनुमतीनुसार जामनेर नगरपालिकेचे गटनेते डॉ.प्रशांत भोंडे यांच्या हस्ते कोविड केअर सेंटर मध्ये दाखल व्यक्तींना प्रतिबंधात्मक औषधी चे वाटप करण्यात आले.
डॉ. भोंडे यांनी नागरिकांच्या सोयी सुविधेबद्दल माहिती घेऊन सकस आहार, नियमित व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन, नाकातोंडाला मास्क वापरणे, वारंवार साबणाने 40 सेकंद पर्यंत हात धुणे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे,नोडल अधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ. अनिता राठोड, डॉ., नरेंद्र नाईक औषध निर्माण अधिकारी अमोल सोनवणे, आरोग्य सेविका लता सुरवाडे, सलमा तडवी नगरपालिका कर्मचारी आरोग्य विभाग प्रमुख हिरे भाऊसाहेब उपस्तीत होते.
13 व्यक्तींपैकी कोणालाही एकही लक्षण नसल्याचे आजच्या तपासणीत निष्पन्न झाले असे डॉ.नाईक यांनी सांगितले.