<
जळगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील रिधुर गावात ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रत्येक घरात साबण वाटप करण्यात आले. सध्या सर्वत्र कोविड -१९ या रोगाने थैमान घातले असुन कोरोना आजाराची लक्षणे उशीराने दिसुन येत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता व गावाच्या आरोग्याच्या दुष्टीने हात स्वच्छ धुणे, शरिराची व परिसराची स्वच्छता राखणे पण आवश्यक आहे. त्यासाठी साबण वाटप करण्यात आले. प्रसंगी सरपंच रंजना पाटील, उपसरपंच छगन पाटील, ग्रामसेविका स्वाती पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनोद पाटील, पोलीस पाटील प्रमोद पाटील व अगंणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीस हे उपस्थीत होते. या वेळी मास्क वापरणे, फिजीकल डिस्टन ठेवणे आजारा विषयी काही लक्षणे आढळल्यास वैदयकीय मदत घेणे इ. सुचना संपुर्ण गावकऱ्यांना देण्यात आल्या. याकामी गटविकास अधिकारी शशीकांत सोनवणे, ग्रामविस्तार अधिकारी निळकंढ ढाके व आरोग्य विस्तार अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.