<
फैजपूर(किरण पाटील)- श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रति वर्षी आषाढी वारी करिता डीगंबर महाराज, चिनावल यांनी चिनावल ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा परंपरा सुरू केला तेंव्हा पासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे . डीगंबर महाराज चिनवलकर याचे नंतर वै.विठ्ठल महाराज हंबर्डीकर व अरुण महाराज बोरखेडेकर यांनी ही परंपरा जोपासली. आता विद्यमान दिंडी प्रमुख ह. भ.प.दुर्गदास नेहेते महाराज ही परंपरा चालवत आहे. यावर्षी कोरोना संसर्ग जन्य रोगाच्या महामारी संकटांमूळे सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात लावडावून लागू केला आहे. यामुळे नियमाला अधिन राहून यावर्षीचा आषाढी पायी दिंडी सोहळा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती दिंडीचे प्रमुख ह.भ.प. दुर्गदास महाराज नेहेते व डीगंबर महाराज मठ पंढरपूर चे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी कळविले आहे. तसेच श्री क्षेत्र पंढरपूर येथील मठातील सर्व कार्यक्रम होणार नाही. तथापि आपली परंपरा अखंडित राहणे साठी दिंडी चे प्रतिनिधींना पंढरपूर येथे आषाढी वारीस जाण्यास सरकार कडे परवानगी मागितली आहे. सरकारचे धोरणांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे डीगंबर महाराज मठ पंढरपूर चे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी कळविले आहे.