<
कळंब, प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यात दि.३० रोजी ७ रुग्ण आढळून आले. आज 52 स्वाब तपासणीसाठी पाठवले होते ७ पॉसिटीव्ह आहेत तर 44 नेगेटिव्ह आहेत, एक inconclusive आहे. यापैकी एक जण उमरगा तालुक्यातील बेडगा येथील असून तो पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे तर दुसरा कळंब तालुक्यातील शिराढोण येथील असून उस्मानाबाद मधील प्रायव्हेट डॉक्टर ला दाखवून जिल्हा रुग्णालयात दाखल झाला असून त्याचा अहवाल कोरोना positive आला आहे तर कळंब स्थानिक चे पाच रुग्ण कोरोना positive आढळले असून कुर्ला मुंबई येथून आले आहेत.
आज दिवसभरात ७ रुग्णाची वाढ झाल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या ७१ वर पोहोचली आहे. त्यापैकी ५४ जण रुग्णालयात उपचार घेत असून १५ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर दोन जण दगावले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.