<
मुक्ताईनगर(प्रतिनिधी)- कोरोना विषाणू मुळे संपूर्ण जगात महामारीचे सावट दिसू लागले असून ते थांबवण्यासाठी सरकारने जनतेला घरा बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. साधारण दोन महिन्यांपासून संपूर्ण बंद आहे. त्यामुळे देशातील गरीब जनतेला ह्याचा सर्वात जास्त फटका बसला असून ज्या लोकांचे हातावर पोट आहे त्यांच्यावर भूकमारीची वेळ येत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वांनी सामाजिक अंतर पाळत प्रशासनास सहकार्य केले. पण बांधकाम क्षेत्रात काम करण्याऱ्या कारागीर व मजूर, कचरा वेचनारे, घरकाम करणाऱ्या महिला, निराधार वृद्ध, सफाई कामगार या लोकांचे काम बंद झाल्याने त्यांना अर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही समस्या लक्षात घेऊन तालुक्यातील वडोदा येथील वृंदावन ग्रामसंघा तर्फे वडोदा गावातील गरजू, अपंग, निराधार महिलांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. प्रसंगी ग्रामसंघाच्या अध्यक्षा स्वप्ना संदिप खिरोळकर, सचिव रुपाली संदिप हिंगे, कोषाध्यक्ष रेखा अनिल हागे यांच्या हस्ते सोशल डिस्टनिंग पाळून करण्यात आली. यावेळी लिपिक संजीवनी ढगे, गावातील सीआरपी, कृषी सखी, पशुसखी, आदी महिला उपस्थित होत्या.