<
कळंब, प्रतिनिधी(हर्षवर्धन मडके):- कळंब तालुक्यातील शिराढोण येथे रुग्णांची संख्या ४ झाली असून त्यापैकी एक ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी शिराढोण येथे भेट देऊन कन्टेमेट झोन ची पाहणी केली तसेच ग्रामपंचायत कार्यालय आणि पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग यांना सुचना दिल्या. तसेच कंटेन्मेट झोनमध्ये सेनीटायझेशचे काम जास्त प्रभावी करणे व त्या भागात राहणा-या नागरिकांची सर्दी, खोकला, ताप व ईतर आजारबाबतची तपासणी दररोज करण्याच्या सुचना संबंधीत विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.याचसोबत कंटेन्मेंट भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू जसे भाजीपाला, किराणा व ईतर वैद्यकीय सेवा याचा तुटवडा होणार नाही याची दक्षता घेणे आदिंबाबत सुचना दिल्या. कंटेन्मेंट झोन व्यतिरीक्त नागरिकांनी सुध्दा घरातच राहणे खूप गरजेचे आहे, फक्त जीवनावश्यक वस्तू घेण्याकरिताच नागरिकांनी सोशल डिस्टसींग नियमाचे काटेकोर पणे पालन करून, तोंडावर मास्क किंवा चांगला धुतलेला रूमाल बांधून व सेनीटायझारचा वापर करूनच वस्तू आणावी व प्रशासनास सहकार्य करावे असेही जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी सांगितले.यावेळी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तहसिलदार मंजुषा लटपटे, नायब तहसिलदार जमादार, गटविकास अधिकारी राजगुरु, तालुका वैद्यकीय अधिकारी जाधव, पोलीस निरीक्षक जाधव, वैद्यकीय अधिकारी सुधीर जोगदंड, डॉ साबळे, संरपच पद्माकर पाटील, ग्रामविकास अधिकारी पुदाले उपस्थित होते.