<
कळंब प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्हयातील ९० व्यक्तींचे स्वॅब काल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी ७५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले तर २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते व तीन व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला होता तर आणखी दहा अहवाल प्रलंबित होते, त्यांचे अहवाल आता आले आहेत.
दहा पैकी तीन पॉजिटीव्ह आणि सात Inconclusive रिपोर्ट आला आहे. पंजिटिव्ह रुग्णामध्ये सुंभा ता. उस्मानाबाद येथील एक २३ वर्षाची महिला, दोन जण वाटेफळ ता. परंडा येथील रुग्ण आहेत. एक रुग्ण ४० वर्षाचा तर एक रुग्ण २४ वर्षांचा आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 76 कोरोना रुग्ण सापडले असून 19 जण बरे झाले आहेत. तर 54 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि आतापर्यंत 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.