<
जळगाव परिमंडळ : निसर्ग चक्रीवादळ दि.04 जुन रोजी धुळे व नंदुरबार जिल्हयात धडकणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्या पार्श्वभुमीवर महावितरणची प्रशासन यंत्रणा सतर्क आहे. आपातकालीन स्थितीत वीज खांब पडणे, वीजतारा तुटणे वा रोहित्र जळणे इ. बाबत नागरिकांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राच्या टोल फ्री क्रमांकावर वा जिल्हास्तरीय आपातकालीन नियंत्रण कक्षास संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येते आहे.
महावितरणच्या कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी थांबावे, महावितरणच्या सुचिवरील सर्व कंत्राटदार संस्थानी आवश्यक साधन-सामग्रीसह सज्ज राहण्याचे आदेश मुख्य अभियंता मा.श्री. दिपक कुमठेकर यांनी दिलेले आहेत. नागरिकांनी वीज खांब, वीज तारा व रोहित्रांपासून सुरक्षित अंतर राखावे, कुठेही वीजतारा तुटून पडल्यास वीजतारांना व वीजयंत्रणेस स्पर्श करू नये, ही खबरदारी घ्यावी.
आपातकालीन स्थितीत मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राच्या 1912, 1800-102-3435, 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकावर किंवा जिल्हास्तरीय आपातकालीन नियंत्रण कक्षास धुळे (7875766763) , जळगाव (7798120155),नंदुरबार (7875554543) संपर्क साधावा.