<
जळगाव, दि.२ – केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावकडून युवक-युवतींची कोणतीही समिती स्थापन करण्यात आलेली नसल्याची माहिती जिल्हा युवा समन्वयक नरेंद्र डागर यांनी दिली आहे.
नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्ह्यात ३१ स्वयंसेवक असून ते जिल्हाभर विविध उपक्रम रावबीत असतात. सर्व स्वयंसेवकांचे कार्य जिल्हा समन्वयकांच्या मार्गदर्शनानुसार सुरू असते. सध्या सोशल मिडियात जळगावची एक समिती स्थापन करण्यात आल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक अशी कोणतीही समिती स्थापन करू शकत नाही. जळगाव जिल्ह्यात कोणतीही समिती स्थापन केलेली नसून सोशल मिडियातील पोस्ट ही कुणीतरी केलेला खोडसाळपणा आहे. सदरील पोस्ट कुणीही सोशल मीडियावर पसरवू नये, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र यांनी केले आहे.