<
जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या निर्देशानुसार टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढता मृत्यूदर लक्षात घेता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी 03 जून 2020 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्याप्रसंगी आयोजित बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तज्ज्ञ मार्गदर्शन कोरोना विषाणू बाधित रुग्णांसाठी योग्य तो औषधोपचार व सल्ला देण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात येत असून टास्कफोर्ससाठी नियुक्त डॉक्टर्स, त्यांचे पदनाम व त्यांचा भ्रमणध्वनी पुढील प्रमाणे..
डॉ.सुनिल चौधरी-अध्यक्ष- 9850900553, डॉ.गौरव महाजन -सदस्य- 9930480596,डॉ. कल्पेश गांधी- सदस्य-9871603964, डॉ.सुशिल गर्जर-सदस्य-8551017699, डॉ.अभय जोशी-सदस्य-9561088332, डॉ. निलेश चांडक- सदस्य -9421987576, डॉ.लिना पाटील- सदस्य-9325755055, डॉ.पंकज बढे-सदस्य-9423785856, डॉ.रविंद्र पाटील-सदस्य-9405060530, डॉ.राहूल महाजन-सदस्य-9822597250, डॉ.नागोजी चव्हाण-जिल्हा शल्य चिकित्सक-सदस्य सचिव-7020949528 अशा प्रकारे टास्क फोर्सचे पदाधिकारी व सदस्य असून हे सर्व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणाऱ्या डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ यांना दररोज सल्ला तसेच मार्गदर्शन करतील. याअंतर्गत एखाद्या रुग्णाची प्रकृती खालावत असल्यास त्या रुग्णास जळगाव जिल्ह्यातील उच्च प्रकारच्या वैद्यकीय उपचारांच्या सोयी-सुविधा असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठविण्याबाबत किंवा आवश्यक भासल्यास जिल्ह्याबाहेर सुविधा उपलब्ध असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठविण्याची शिफारस करतील. क्रिटीकल रुग्णांच्या बाबतीत व्ही.सी. द्वारे उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत संवाद साधून दररोज आढावा घेतील. शासकीय महाविद्याल, जळगाव यांचे संबंधी सर्व संलग्न रुग्णालये, जिल्ह्यातील इतर रुग्णालये यांना कोरोना बाधितांवर उपचार करणेकामी तसेच योग्य त्या ट्रिटमेंट प्रोटोकॉलसाठी कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन संबंधितांना हवे असल्यास सर्वांना व्हिडीओ कॉलद्वारे करण्यात येईल. क्रिटीकल केअरसाठीच्या बेडीची संख्या वाढविण्यासाठी शिफारस समिती करेल. टास्कफोर्सने त्यांच्या स्तरावर वेळोवेळी बैठकांचे आयोजन करून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमधील/व्यवस्थेमधील सुधारणांसाठी आवश्यक वाटतील अशा सर्व उपाययोजना सुचविण्याचे कार्य सुद्धा नियुक्त टास्क फोर्स करणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. ढाकणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.