<
जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगांव जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंजि. राहुल सोनवणे व मित्र परिवारातर्फे शहरातील पोलीस व गोरगरीब मजुर यांना मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बाटली आणि ग्ल्यूकॉन डीचे वाटप करण्यात आले. तसेच गरजूंना अंडी व संत्रीचेही वाटप करण्यात आले. यासाठी जगदीश मामा, सायबू भाऊ, विशाल वाघ, कुंदन पाटील, महेश चिंचोलकर, मयुर गायकवाड, शंभू भोसले, दीपक गवळी, दिपक शिरसाठ, गोपाल गायकवाड, धनराज निंबाळकर, कल्पेश कदम व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.