<
रावेर – (प्रतिनिधी) – भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव तर्फे एक वृक्ष माझ्या अंगणात या अभिनव उपक्रमाला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुरुवात करण्यात आली.
सदरच्या कार्यक्रम रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे जिल्हा युवा समन्वयक नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. खिर्डी बुद्रुक या गावचे लोकनिर्वाचित सरपंच गफूर भाऊ कोळी यांच्या हस्ते वृक्षरोपण ला सुरुवात करण्यात आली सदरची वृक्ष हे गावातील लोकांच्या अंगनात लावण्यात आली लोकांना त्याचे संगोपनाचे आव्हान करण्यात आले.
कोविड 19 च्या वाढत्या संकटामध्ये कोविड योद्धा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यासोबतच पर्यावरणाचे संरक्षण करण्याकरता प्रत्येक पर्यावरणप्रेमींनी व जागरूक नागरिकांनी आपल्या अंगणात एक वृक्ष किंवा आपल्या शेताच्या बंधाऱ्यावरती कमीत कमी एक वृक्ष लावल्यास येत्या काळामध्ये आपला परिसर आपला देश हिरवळ झाल्याशिवाय राहणार नाही त्यासोबतच आपण आपल्या अंगणात झाड लावलं त्याचं संरक्षण करण्यास नागरिकांना कुठली प्रकारची अडचण निर्माण होणार नाही व झाडाचे संगोपन योग्यरीत्या होईल. हा उपक्रम खिर्डी बुद्रुक या गावामध्ये नव्हे तर रावेर तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांन मार्फत पोचण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे आपला तालुका येत्या काळामध्ये हिरवळ झाल्याशिवाय राहणार नाही.
सदर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाप्रसंगी खिर्डी बुद्रुक गावचे ग्रामपंचायत सदस्य पंकज राणे व पत्रकार विनायक जहूरे, जगदीश कोचुरे हजर होते. सदर कार्यक्रमाचे कामकाज जिला युवा समन्वयक नरेंद्र डागर व लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुका समन्वयक शिवदास कोचुरे पाहत आहे