<
कळंब, प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्हयातील आज दिनांक 05/06/2020 रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 45 samples शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले .त्यापैकी बारा पॉझिटिव्ह तर 4 inconclusive आणि 29 निगेटिव आले आहेत.
८ रुग्ण शिराढ़ोन ता.कळंब येथील असून हे सर्व पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. आणि दोन रुग्ण हासेगाव ता. कळंब येथील पूर्वीच्या आंदोरा येथील रुग्णाच्या संपर्कातील आहेत असे एकूण दहा पेशंट कळंब तालुक्यातील आहेत. व दोन रुग्ण ढोकी ता उस्मानाबाद येथील असून ते पुणे रिटर्न आहेत.अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत ११६ कोरोना रुग्ण सापडले असून आतापर्यंत ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.