<
चोपडा (प्रतिनिधी) – नेहरू युवा केन्द्र, जळगाव संलग्नित निमगव्हाण (ता.चोपडा) येथील तापी फाऊंडेशन व तांदलवाडी (ता.चोपडा) येथील सत्यं – वद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जुन जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमेचे औचित्य साधून तापी परिसरातील निमगव्हाण, तांदलवाडी व दोंदवाडे या गावात शुक्रवारी ग्रामस्थ व सौभाग्यवतींना वडाच्या रोपट्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी तांदलवाडी सरपंच सुनिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते गजानन कोळी (दोंदवाडे) उपस्थित होते.
वितरित होणा-या प्रत्येक रोपट्याचे भविष्यात वृक्षात रूपांतर करण्याची जबाबदारी घेणा-या व्यक्ती व कुटुंबालाच यावेळी रोप देण्यात आले.
या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.
उपक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांचे मार्गदर्शन लाभले.
अशा प्रकारचा चोपडा तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे बोलले जात आहे.
उपक्रम यशस्वीतेसाठी तापी फाऊंडेशनचे अनिल शिवाजी बाविस्कर, प्रा.यशवंत पाटील, लिलाधर बाविस्कर, विशाल पाटील, अरूण पाटील, गोपाल पाटील, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक निलेश बाविस्कर, संदिप इंगळे, सूकदेव कोळी, युवराज पाटिल, ज्ञानेश्वर कोळी, ललित चव्हाण यांच्यासह श्री.दादा सेवा समिती व ग्रामविकास समितीने परीश्रम घेतले.
परिसरातील नागरिकांना पिंपळ किंवा कडुनिंबाची रोपे हवे असतील, त्यांनी ८८८८०४६९५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.