Saturday, July 26, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवराज्यभिषेक दिनानिमित्त शिक्षिका सुवर्णलता अडकमोल यांनी लेखनातून दिला व्यसनमुक्ती सह महिलांचा सन्मानाचा संदेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/06/2020
in लेख, विशेष
Reading Time: 1 min read
शिवराज्यभिषेक दिनानिमित्त शिक्षिका सुवर्णलता अडकमोल यांनी लेखनातून दिला व्यसनमुक्ती सह महिलांचा सन्मानाचा संदेश

आज ६ जून आहे. आपल्या महाराष्ट्रात मराठमोळी जनतेमध्ये अस कोणी नसेल की ज्यांना १९ फेब्रुवारी आणि ६ जून काय असते हे माहीत नसेल, समजलेच असेल तुम्हाला मी आपल्या जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लिहत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नावच अस आहे ज्यांच्या नावाच्या ललकारी ने देखील आपल्याला प्रेरणा मिळते. शिवाजी महाराज भारतीय राज्यकर्ते आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. बालपनामधेच त्यांनी राजकारण आणि युध्दाचा अभ्यास केला. ते सर्व कलांचे स्वामी होते थोडक्यात सांगायचं झालं तर…मोगलांचे ते पाहून वर्तनज्याने शत्रूचे केले मर्दनज्याचा संभाजी हा छावाज्यानं शिकवला गनिमीकावाज्याची अद बीची नजरमाता बहिणींना दिला आदरराहून सदैव सावधअफजखाना चा केला वधज्या साठी शहीद झाला ताना,ज्यानं शिकवला मराठी बाणास्वराज्याचे बांधून तोरणयवणाना केले हैराण.असा हा रयतेचा राजा शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. खूप लोकांना प्रश्न आहे मावळे म्हणाजे काय ? तर सह्याद्रीच्या दोन डोंगर रांगां मध्ये दरीला मावळ तर तेथील सैनिकांना मावळे म्हणत. पुण्याखली १२ तर जुन्नर शिवनेरी जवळ १२ अशी एकूण २४ मावळ होती. या मावळ्यांचा मदतीने उभारलेल्या छत्राखाली शिवाजी राजे बसले आपल्या प्रजेला त्यांचा राजा समजावा म्हणून त्यांनी स्वतः चा रायगडावर शिव राज्याभिषेक करून घेतला. ज्या दिवशी त्यांनी राज्यभिशेक केला तोच दिवस म्हणजे ६ जून १६७४ या दिवशी तमाम पोरक्या जनतेला त्यांचा राजा मिळाला.तेव्हापासून शिवराज्यभिषेक शक सुरू झाले. त्यांनी शिवराई हे चलन सुरू केले. अश्या या जाणता राजांचा ६ जून ला राज्यभिषेक सोहळा आहे, तमाम जनता शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करण्यास उत्सुक केली आहे. याच निमित्ताने मी आजच्या व्यसनाधीन असलेला पुरुष वर्ग व युवा वर्ग यांना संदेश देवू इच्छिते की हल्ली कोरोनाचा सगळीकडे कहर आहे त्यातच लॉकडाऊन सुरू आहे. जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर बाकी सर्वच बंद आहे मग त्यात दारू, सिगरेट, पान, तंबाखू, गुटखा या गोष्टी देखील बंद आहे. ज्यांना या गोष्टींचं व्यसन आहे ते लॉक डाऊन मुळे या गोष्टींपासून दूर राहिले. थोड्या काळासाठी का असेना लॉक डाऊन ने आपल्या ला हे दाखवून दिले की जर तुम्ही या गोष्टींचं व्यसन जरी नही केले तरी जिवंत राहू शकतात. मी सांगू इच्छिते की ही मिळालेली एक सुवर्णसधी आहे. स्वतः च आयुष्य व्यसन मुक्त करा. आयुष्य सुंदर आहे ते जतन करा. जिंदगी आपकी फैसला आपका. तसेच शिवाजी महाराजांच्या काळात महिलांना खूप आदराने वागविले जात होते जर तुम्ही खरच शिवाजी महाराजांना मानत असाल तर आई, बहीण, बायको मग ती तुमची असो किवा दुसऱ्याची त्यांचा आदर करा, तर खरच आपण शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन करण्यास पात्र आहोत. शिवाजी महाराजांचे वर्णन शब्दात किती ही सांगितले तरी अपूर्णच आहे तरी बोलावेसे वाटते”स्थापूनी हिंदवी स्वराज्य आपुले शौर्याने लिहिली इतिहास गाथा,असा हा जाणता राजा माझा त याच्या चरणी झुकविते माथा”जय जिजाऊ ,जय शिवराय.कोरोना हरवू, महाराष्ट्र वाचवू.

लेखिका-सुवर्णलता अडकमोलशिक्षिकासरस्वती विद्या मंदिर, शिव कॉलनी, जळगांव

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1001: आज 44 रुग्ण पॉझिटिव्ह

Next Post

कोविड सेंटरमध्ये असुविधा आढळल्यास थेट संपर्क साधा- जिल्हाधिकारी

Next Post
कोविड सेंटरमध्ये असुविधा आढळल्यास थेट संपर्क साधा- जिल्हाधिकारी

कोविड सेंटरमध्ये असुविधा आढळल्यास थेट संपर्क साधा- जिल्हाधिकारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

निःशुल्क एक्यूप्रेशर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न;मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागाचा उपक्रम

निःशुल्क एक्यूप्रेशर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न;मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागाचा उपक्रम

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications