<
चोपडा(प्रतिनिधी)- दि. ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी गौरव दिन शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त चोपडा येथे डॉ. चंद्रकांत बारेला व मित्र परिवार यांची भव्य स्वाभिमान रॅली आयोजित करण्यात आली होती. तरी रॅली साठी प्रचंड जनसमुदाय जमलेला होता.रॅली कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातून सुरू झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाबासाहेब आंबेडकर चौकात येवून पावसामुळे परत कृषी उत्पन्न बाजार समितीत येवून संपन्न झाली. पाऊस जास्त होता पण त्यापेक्षा रॅलीत आदिवासी बांधवांचा उत्साह जास्त होता..त्यावेळी डॉ.चंद्रकांत बारेला यांनी जनतेला आपल्या पुढील वाटचालीसाठी दिशानिर्देश दिले आणि रॅलीची सांगता करण्यात आली. डॉ चंद्रकांत बारेला यांनी मागील काही महिन्यांपासून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.या मिरवणुकीत आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून मोठ्या उत्साहात सहभागी झाले.भर पावसात सुध्दा आदिवासी समाज एवढ्या मोठ्या संख्येने हजर असल्याने डॉ बारेला यांचे हे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन तर नाही ना ?असे वाटत होते.तालुक्यातील कोपऱ्यातून आदिवासी बांधव रॅलीत सहभागी झाले होते..सचिन पाटील , ईश्वर सुर्यवंशी ,अमोल राजपूत , दिपक वानखेडे , विजय बारेला, दिलीप बारेला,रेहमान तडवी, विनोद तडवी, राकेश पावरा ,शकील शेख, अज्जू भाई ,दिलावर पिंजारी, सलीम तडवी, जावेद शेख, लखन पाटील, स्वप्निल पाटील , रघन बारेला, राजू बारेला , सागर बारेला, ईश्वर भिल्ल,सागर कोळी,भुषन सोनवणे ,वसंत कोळी यावेळी डॉ.चंद्रकांत बारेला आणि मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते.