<
बक्षीस व प्रमाणपत्र वितरण सोहळा
नाशिक – दिनांक ३१ मे २०२० रोजी युट्युब लाईव्ह च्या माध्यमातून तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय मासिक पाळी आरोग्य सप्ताह आठवडाभर जनजागर कार्यक्रमाचे संपूर्ण आठवडाभर युट्युब व फेसबूक लाईव्ह च्या माध्यमातून आयोजन करण्यात आलेले होते.
दररोज रात्री ९ वाजता ता. २४ मे पासून ३० मे पर्यंत, फेसबुक व यु ट्युबवर लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयक जनजागर,प्रबोधन, मार्गदर्शन, मुलाखत, परिसंवाद आणि चर्चासत्रांमध्ये
दि. २४ – श्रीमती सुवर्णा पाटील
(मास्टरट्रेनर जीवनकौशल्य)
दि. २५ – सौ. सुनिता काटम
दि. २६ – सचिन आणि शर्वरी(समाजबंध
सामाजिक संस्था,पुणे)
दि. २७ – डॉ. वैभव दातरंगे(NIMA नाशिक)
दि. २८ – श्रीमती अश्वीनी चौमल
(मेडफेम इंडिया,मुंबई)
दि. २९ – शितल पवार(संगिनी महिला
जागृती मंडळ,नाशिक)
– राहूल बिराजदार
(राज्य युवा परिषद सोलापूर)
दि. ३० – श्रीमती सीमा खंडाळे
(आशय सोशल ग्रुप,मुंबई)
यांचेसोबत चर्चा व मुलाखतीद्वारे मासिक पाळी दरम्यान उद्भवलेले प्रश्न, समस्या,शंकांचे मार्गदर्शक तज्ञाद्वारे निरसन करण्यात आले.
तंत्रस्नेही शिक्षक समूहाद्वारे, वक्तृत्व व निबंध स्पर्धा ऑनलाइन घेतल्या गेल्या. त्याकरिता दोन गट पाडण्यात आले होते. या स्पर्धेत मुले व मुली दोघांनीही अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होत. गट अ “इयत्ता सातवी ते नववी”, तर गट ब-” दहावी पुढील युवतींसाठी ठरवून दिलेला होता. निबंधाची शब्द मर्यादा ३०० शब्द तर वक्तृत्व स्पर्धेसाठी व्हिडिओ कमाल वेळ चार ते पाच मिनिटे होती. गुगल फॉर्म मार्फत ऑनलाइन माहिती भरून निबंध व वक्तृत्व स्पर्धेचा व्हिडिओ अपलोड करून स्पर्धेत स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक होते.
या स्पर्धेकरता खालील प्रमाणे विषय देण्यात आले होते.
स्पर्धेचे विषय –
१. पाळीशी जुळवून घेतांना (शारीरिक व मानसिक बदल)
३. पर्यावरण स्नेहीपाळी
(वैयक्तिक स्वच्छतेच्या शाश्वत सवयी)
३. धाकट्या बहिणीला काय सांगाल?
(पाळी सुरू होण्यापूर्वी मानसिक तयारी).
दिनांक ३१ मे २०२० रोजी यूट्यूब च्या माध्यमातून तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र यांच्यातर्फे आयोजित निबंध व वक्तृत्व स्पर्धेचा निकाल रोटरी क्लब नाशिक विजन नेस्ट यांचे अध्यक्ष माननीय पंकज अलठक्कर सर यांचे मार्फत घोषित करण्यात आला. आणि विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूप डिजीटल सन्मानपत्र देण्यात आले.
विजेत्या विद्यार्थ्यांची /व्यक्तींची नावे:-
वक्तृत्व स्पर्धा(मोठा गट)
प्रथम. – कु. अमीषा गयाली
द्वितीय – राजू खंडारे
तृतीय. – श्रीमती इंदिरा राणे
प्रोत्साहनपर बक्षीस :-
१) श्री.दिलीप पवार
२)विक्रम राठोड
वक्तृत्व स्पर्धा(लहान गट)
प्रथम – कु.सिमरन काझी
द्वितीय – कु. प्रणाली वावधाने
निबंध स्पर्धा(मोठा गट)
प्रथम – कुणाल सुभाष ढगे
द्वितीय – कु.स्मिता वसंतराव सालवणकर
तृतीय – सार्थक सुधीर बाभळे
प्रोत्साहनपर बक्षीस –
कु.सई संतोष दडपे
निबंध स्पर्धा(लहान गट)
प्रथम – सुधीर गोपीचंद बाविस्करद्वितीय – कु. स्नेहल अंकुश गोडसेतृतीय – कु.रजनी नरेंद्र चौधरी
सर्व बक्षीस पात्र विजेत्या विद्यार्थ्यांचे तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र तर्फे हार्दिक शुभेच्छापर डिजिटल प्रमाणपत्र ऑनलाइन प्रदान करुन अभिनंदन करण्यात आले. या आठवडाभर चाललेल्या आंतरराष्ट्रीय मासिक पाळी आरोग्य सप्ताह निमित्त कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समूहप्रमुख नितीन केवटे, मुख्य पर्यवेक्षक कृष्णा कालकुंद्रीकर, सहा. मुख्य पर्यवेक्षक पंकज जगताप,ज्येष्ठ तज्ञ मार्गदर्शक मिलिंद पगारे, मधुकर घायदार, ब्लॉग प्रमुख सुनील बडगुजर, प्रशासक विश्वम्बर बोकडे, शर्मिला देसले, सदाशिव अत्तरकार,भागवत भंगे, किशोर सोनवणे, गणेश कोठावळे,खुशाल डोंगरवार, सुदर्शना नाईकनवरे, रवींद्र भोंग,मन्साराम मेश्राम, मनीषा पांढरे, विशाल पेचे, विपुल घोलप, उमेश राठोड,सुखदेव भालेकर, अण्णा राठोड, सुधाकर आडे, दीपाली आहेर, विवेक बैस्कार, नेपाल वालदे, जया मुटके, सचिन पायके,निलेश कासार, विजय नेटके, साहेबराव मोहोड,प्रवीण बोरसे, संदीप शेंडे,सिद्धेश्वर गवळी, प्रकाश नारकर, नेटके सर, हेमंत चोपडे, वैभव चेके,स्नेहांकिता डाकवे, मंगला एंडोले यांनी संपूर्ण आठवडाभर चाललेला कार्यक्रम यशस्वी करण्यात बहुमोलाचे सहकार्य केले.