Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हज यात्रा रद्द करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी हज समितीला संपर्क साधण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
हज यात्रा रद्द करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी हज समितीला संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई, दि. ७ : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हज यात्रेची अनिश्चितता पाहता ज्या यात्रेकरुंना आपली यात्रा रद्द करावयाची आहे, त्यांनी केंद्रीय हज समितीला ईमेलद्वारे कळवावे. या यात्रेकरुंनी भरलेली संपूर्ण रक्कम त्यांना कोणत्याही कपातीशिवाय परत दिली जाईल, असे केंद्रीय हज समितीने कळविले आहे.

Maha Info Corona Website

जगभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता १३ मार्च २०२० रोजी सौदी प्रशासनाकडून हज २०२० साठीची तयारी तात्पुरती थांबविण्याबाबत कळविण्यात आले होते. पण त्यानंतर आता हज २०२० च्या तयारीसाठी फार कमी कालावधी राहिलेला असताना सौदी प्रशासनाकडून अद्याप पुढील सूचना प्राप्त झालेली नाही. यंदा जुलै-ऑगस्टमध्ये ही यात्रा आहे. दरवर्षी याची तयारी फार आधीपासून सुरु केली जाते. पण यंदा आता तयारीसाठी अत्यल्प वेळ राहिलेला असताना अद्यापही सौदी प्रशासनाकडून पुढील सूचना मिळालेली नाही. तथापी, यंदाच्या यात्रेसाठी निवड झालेले उमेदवार हज समितीकडे याबाबत सातत्याने विचारणा करीत आहेत. त्यामुळे निवड झालेले जे उमेदवार आपली हज यात्रा रद्द करु इच्छितात त्यांनी केंद्रीय हज समितीच्या संकेतस्थळावर दिलेला यात्रा रद्दीकरणाचा फॉर्म भरुन तो [email protected] या ई-मेलवर पाठवावा. तसेच सोबत बँक पासबूक किंवा रद्द केलेल्या धनादेशाची फोटोकॉपी जोडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

यात्रा रद्द करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना त्यांनी भरलेली १०० टक्के रक्कम कोणत्याही कपातीशिवाय परत करण्यात येईल, असेही केंद्रीय हज समितीने कळविले आहे. केंद्रीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मकसूद अहमद खान यांनी देशातील सर्व राज्यस्तरीय हज समित्यांना पत्राद्वारे ही बाब कळविली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र आयोजित आंतरराष्ट्रीय मासिक पाळी आरोग्य सप्ताह(आठवडाभर जनजागर)

Next Post

कोरोनामुक्तीचा मालेगाव पॅटर्न मॉडेल म्हणून समोर येतोय – महसूल मंत्री

Next Post
कोरोनामुक्तीचा मालेगाव पॅटर्न मॉडेल म्हणून समोर येतोय – महसूल मंत्री

कोरोनामुक्तीचा मालेगाव पॅटर्न मॉडेल म्हणून समोर येतोय – महसूल मंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo