<
मुंबई, दि. ७ : 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. 15 मे 2020 ते 7 जून 2020 या काळात 10 लाख 78 हजार 121 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली. आज दिवसभरात 68 हजार 442 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 39 हजार 473 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 7,710 अनुज्ञप्ती सुरू आहेत. राज्य शासनाने 3 मे, 2020 पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. राज्यात दि.15-05-2020 पासून घरपोच मद्यविक्री योजनाअंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थलावरऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. 1 मे 2020 ते 31 मे 2020 या काळात 1 लाख 20 हजार 547 ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी 1 लाख 10 हजार 763 ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.
ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेताना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असून आता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, ॲड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पध्दतीने सुध्दा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरिता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरिता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात.
दि.24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. दि.7 जून 2020 रोजी राज्यात 82 गुन्हे नोंदविण्यात आलेअसून 41 आरोपींना अटक करण्यात आली असून 17 लाख 34 हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि.24 मार्च, 2020 पासून दि.7 जून 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 7,452 गुन्हे नोंदविण्यात आले असून 3,450 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 675 वाहने जप्त करण्यात आली असून 18 कोटी 99 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३ व्हाट्सॲप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून [email protected] ई-मेल आहे.