<
जळगांव(प्रतिनिधी)- वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, जळगांव शहर यांनी ”शिवराज्यभिषेख दिनानिमित्त” आयोजित केलेल्या तीन दिवसीय ऑनलाइन स्पर्धा मालिका नुकतीच संपली असून तिचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सदरील स्पर्धा ४ जुन ते ६ जुन या तीन दिवसांत तीन टप्यात घेतली गेली असून त्या स्पर्धा क्रं.१-गडांसोबतचे उत्कृष्ट छायाचित्र, २-चित्र रेखाटन स्पर्धा, क्रं.३-Onlime Quize कंपेटिशनअसे टप्पे होते. तिघी स्पर्धांना चांगला प्रतिसाद दिला असून पूर्णताहा जवळ पास 445 विद्यार्थ्यांनि यात सहभागी घेतला.या तिघी स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे-स्पर्धा क्रं.१-गडांसोबतचे उत्कृष्ट छायाचित्र- कु.अभिलाष चौबे, कु.यधनेश सोनार, कु.सचिन मौर्य आहेत.स्पर्धा क्रं.२-चित्र रेखाटन स्पर्धा -कु.प्रिया कैलास कासार, कु.अमिय मोहन लोखंडे, कु.विशाल सतीश सोनवणे आहेत. या स्पर्धेचा निकाल स्वतः निलेश चौधरी सर(चित्रकला शिक्षक,जळगांव) यांनी लावला आहे.स्पर्धा क्रं.३-‘Onlime Quize Competition-कु.भूषण नेरकर, कु.आशिष पगारे, कु.मोहित भंगाळे आहेत. तिघी स्पर्धाचे निकाल पारदर्शीक पाधीतीने लावले असून त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तकांचा संच देण्यात येणार आहे. सर्व सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले आहे. या स्पर्धत प्रामुख्याने शिवश्री दुर्गेश पाटील, शिवश्री गौरव पाटील, शिवश्री हर्षवर्धन खैरनार, शिवश्री हेमंत माळी, शिवश्री प्रतीक बोरसे, शिवश्री निरंजन चौधरी, शिवश्री वरून शिंदे या जळगांव शहर कार्यकारिणीने परिश्रम घेतले. त्यांना शिवश्री अविनाश बाविस्कर, शिवश्री रुपेश महाजन, शिवश्री चेतन तांगडे, शिवश्री भूषण सुर्यवंशी, शिवश्री रोहन महाजन, शिवश्री मनोज बाविस्कर, शिवश्री सचिन माळी, कु.चेतना पाटील व सर्व वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद,जळगांव जिल्हा यांचे सहकार्य लाभले. अश्याच स्पर्धा सुरू ठेवणार असून 24 जुन ला पुन्हा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.