<
जळगाव (प्रतिनिधी) कोरोना महामारीने संकटात सापडलेल्या तसेच बेरोजगार झालेल्या जळगाव शहरातील विधवा , हातमजुर , गरजू कष्टकरी समाज बांधवांना सूर्यवंशी क्षत्रिय मराठा वृत्तपत्राचे संपादक श्री कैलास मराठे व विजय पाटील सर यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधीलकीने पहिल्या टप्प्यात 50 किराणा किटचे मोफत घरपोच वाटप करण्यात आले होते.
या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात समाजसेवेसाठी नेहमी तत्पर असणारे श्री रामकृष्ण पंढरीनाथ पाटील सहाय्यक फौजदार जळगाव यांनी सामाजिक बांधिलकी दाखवून 25 किराणा किट देऊ केल्यात . श्री रामकृष्ण पाटील यांचेकडून आज दि 8 जून 2020 रोजी समाजातील 25 गरजू कुटुंबीयांना जीवनावश्यक किराणा किटचे मोफत वाटप करण्यात आले
यावेळी श्री रामकृष्ण पाटील ,सूर्यवंशी क्षत्रिय मराठा मासिकाचे विजय पाटील सर , किशोर पाटील सर , युवामंडळाचे सोनू पाटील , योगेश पाटील , प्रकाश पाटील , शांताराम मराठे आदी उपस्थित होते