<
जळगाव.दि.09 (जिमाका) :- केंद्र शासनामार्फत सन 2019 या वर्षाकरीता तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, युवा कल्याण विभाग, नवी दिल्ली यांनी सन 2019 या वर्षाच्या तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविलेली आहेत. तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार पुरस्कार सन 2019 करिता केंद्र शासनास शिफारस करण्याकरिता खालील प्रमाणे खेळाडुची कामगिरी/ कागदपत्रे असणे आवश्यक आहे. नामांकन सादर करणाऱ्या खेळाडूंनी त्यांची मागिल तीन वर्षातील (म्हणजे 2017, 2018 व 2019) साहसी कामगिरी दर्शविणे आवश्यक आहे, साहसी उपक्रम हे जमीन, पाणी व हवेमध्ये असणे आवश्यक असून खेळाडू या साहसी खेळामध्ये अतिउत्कृष्ट असणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठीचे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 15 जून 2020 असून प्रस्ताव जिल्हा क्रिडा अधिकारी, कार्यालय ए.वींग श्री.छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकूल, जळगाव या कार्यालयात विहित मुदतीत सादर करावेत. अधिक माहिती व अर्ज करीता www.yas.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. असे जिल्हा क्रिडा अधिकारी, जळगाव मिंलींद दिक्षित यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.