<
जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव येथील संजीवन हार्ट हॉस्पिटलचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून केलेले अधिग्रहण रद्द करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून हे हॉस्पिटल अत्यावश्यक बाब म्हणून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, या हॉस्पिटल प्रशासनाने अद्यापही ताबा देण्याची कार्यवाही न केल्यामुळे अधिग्रहण आदेशाची अंमलबजावणी होवू शकलेली नाही. तसेच जळगाव जिल्ह्यात सद्य:स्थितीला पुरेशी बेडची संख्या, सोयीसुविधा उपलब्ध असल्याने हे हॉस्पिटल अधिग्रहण करण्याची तूर्त आवश्यकता नाही. त्यामुळे अधिग्रहणाचा आदेश रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे.