<
फैजपूर(प्रतिनिधी) – पोलीस कर्मचारी कोरोना संसर्ग च्या निर्मूलनासाठी दोन हात करण्यात व्यस्त असल्याचा फायदा चोरट्यांनी घ्यायला सुरुवात केली आहे . शहरातील यावल रोडवरील जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय जवळील युनियन बँकेचे ए.टी.एम. अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे खंडोबा देवस्थानातील दानपेटीत चोरट्यांनी लांबविली या घटनांमुळे एकीकडे कोरोना ची चिंता तर दुसरीकडे चोरट्यांची भीती असे दुहेरी संकट निर्माण झाले आहे. यावल रस्त्यावरील युनियन बँकेचे ए.टी.एम अज्ञात चोरट्यांनी दि. 6 रोजी सायंकाळी 6 वाजे पूर्वी फोडण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी ठरला मात्र चोरट्यांनी ए.टी.एम. चे तसेच त्यात त्यातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चे नुकसान केले या घटनेप्रकरणी बँकेचे कर्मचारी प्रेरणा सिंग यांनी पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान माहिती मिळताच स.पो.नि. राहुल वाघ फौजदार रोहिदास ठोंबरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तपास फौजदार रोहिदास ठोंबरे करीत आहे. तर दुसरीकडे खंडोबा देवस्थान मधील महादेव मंदिरातील दानपेटी व पाण्याची मोटार अज्ञात चोरट्यांनी लांबविली ही घटना 30 मे रोजी घडली देवस्थानचे मठाधिपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास महाराज हे मध्य प्रदेशात असल्याने त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर दि. 6 रोजी मंदिरातील सेवेकरी पवन कुमार यादव यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दानपेटीतील चार हजार रुपये व दोन हजार किमतीची पाण्याची मोटर असा एकूण सहा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फैजपूर पोलीस स्टेशन ला सदर घटना संदर्भात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीस विलगिकरण झाले आहे. तक्रार घेण्यासाठी कोणीच नाही. असे पोलीस स्टेशन मधून सांगण्यात आले. फिर्याद देणार्यानी परतीचा मार्ग त्यावेळेस धरला होता . आठ दिवस झाल्यावर दि ७ जून रोजी गुन्ह्याची नोंद फैजपूर पोलिसांनी केली . सदर घटने संबंधित तपास हेड कॉन्स्टेबल इक्बाल सय्यद करीत आहे. सदर चे चोरटे हे CCTV कॅमेरा मध्ये कैद असून ओळख पटल्यावर पोलीस गुन्हाच छडा लावतील असे समजते. या खंडोबा देवस्थान मध्ये दि. ५ ऑगस्ट २००२, दुसरी घटना ९ मार्च २००३ मध्ये अश्या घटना घडलेल्या आहे. या पाठोपाठ ही घटना घडल्याने दहशत निर्माण झालेली आहे.