<
जळगांव-(प्रतिनिधी) कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात “जलप्रलय” आल्याने तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वच स्तरातून मदत होत असतांना वंचित आघाडी, महानगर शाखेच्या वतीने विविध साहित्य व आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आली होती त्या आवाहनाला आज जळगावकरांनी साद देत भरघोस मदत केली आहे.जमा झालेले साहित्य पूरग्रस्तांना पोहचविले जाणार असल्याचे वंचित आघाडीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
भारिप बहुजन महासंघ संलग्न वंचित बहुजन आघाडी यांच्या तर्फे पुर ग्रस्तांसाठीआज दि.११ रोजी जळगाव येथे जीवनावश्यक वस्तू संकलन केंद्र उभारण्यात आले होते.वंचित आघाडीच्या या मदत केंद्राला जळगावकरांनी साद देत मदत केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे डिगंबर सोनवणे, वैभव शिरतुरे, जितेंद्र केदार, हेमंत सुरवाडे, गणेश महाले, खंडू महाले, किशोर सपकाळे, युवराज झाल्टे, आधार कांबळे यांनी परिश्रम घेतले.