<
जळगांव – देशातील तरुणाईला दिशादर्शक असणारी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविध उपक्रम राबवणारी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया अर्थातच भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निमगव्हाण (ता.चोपडा) येथील तापी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अनिल शिवाजी बाविस्कर यांची तर जिल्हा सचिवपदी जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रीय बुध्दिबळ खेळाडू आकाश अशोक धनगर यांची एकमताने निवड करण्यात आली.
दि.८ जून रोजी त्यांना निवडपत्र प्राप्त झाले.
या सेवाभावी युवकांचे क्रिडा,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्य लक्षात घेता युवा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रामू यांच्या मार्गदर्शनाने राज्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.त्रेवीणीकुमार कोरे यांनी ही निवड केली आहे.
युवा परिषदेच्या माध्यमातून युवकांचा सामाजिक कार्यात सहभाग वाढवून विधायक कार्य करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी बाविस्कर यांनी चोपडा येथील महात्मा गांधी महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे तर धनगर हे देखील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विवीध शिबिरांत सहभागी होवून सामाजिक कार्यात अगेसर असतात.
विविध क्षेत्रात कार्य करणारे सेवाभावी युवक म्हणून या दोन्ही युवकांची समाजात ओळख राहिली असून त्यांच्या या निवडीबद्दल
राज्य सचिव कमलेश सोनवणे (पाचोरा), सदस्य राहूल वाकलकर (चाळीसगाव), जिल्हाध्यक्ष तेजस पाटील (यावल) यांनी अभिनंदन केले आहे तर सर्वस्तरातून कौतुक होत आहे.