<
प्रथम माझ्या सर्व राष्ट्रवादी कुटुंबातील सर्व नेते मंडळी, मंत्री,खासदार, आमदार,पदाधिकारी,व सर्व कार्यकर्ते व,सहकारी मित्र यांना वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…
आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 21 वे वर्ष पूर्ण होऊन आज आपण 22 व्या वर्षात प्रवेश करत असतानाच . गेल्या मागील काळात डोकावून पाहत असताना एक आनंद ही होतो अन वेदना ही तेवढीच आहे, आनंद एवढाच की राजकीय इतिहासात एखाद्या पक्षाची स्थापना होते अन तो पक्ष सलग 15 वर्ष सत्तेत राहतो हा खऱ्या अर्थाने आनंदच म्हणावे लागेल, कारण जस एखादं बाळ राजघराण्यात जन्म घ्यावा अन जन्म दिल्यानंतर त्याच बालपण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला कार्यकर्ता म्हणजे हा राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता होय,त्याच पध्दतीने नेते अन कार्यकर्ते हे सत्तेची ऊब घेत राहिले , ,जे जे शक्य होईल ते ते आपल्या झोळीत टाकून घेत होते,अन जो कार्यकर्ता सायकल वर फिरत होता तो कार्यकर्ता आलिशान गाडीत फिरत असताना पाहणाऱ्या लोकांना सुद्धा अभिमान वाटत होता,
राष्ट्रवादी चा कार्यकर्ता म्हणजे एक वेगळाच रुबाब होता,अंगात कडक नेहरू घातलेला खादी शर्ट बोट लावला तर बोट सुद्धा कापेल अशी गंजी असलेला सदरा,,गाडीतून उतरला तर एक राजबिंडा तरुण समोर उभे असलेल्या लोकांना मोहनी घालावी अशी छबी,, त्याच्या मागून युवकांची जमा झालेली फौज,जनतेच्या मनात घर निर्माण करत होती, अन त्याच काळात युवकांना मनावर अधिराज्य निर्माण करणारे रणजितसिंह ( दादा) मोहिते पाटील यांच्यावर साहेबांनी युवकांची जबाबदारी दिली,अन त्यांनी ही त्या पदाला एक उंची प्राप्त करून दिली,चांदा ते बांदा युवक काँग्रेसचे मजबूत फळी निर्माण करून पुढील अध्यक्ष यांना खडतर असणारा रस्ता सोपा अन सोयीस्कर करून ठेवला.
म्हणतात ना सर्व सुखांची आहुती देऊन संघर्षाकरिता रक्ताचा अभिषेक घालावा लागतो,त्यानंतर च पुढच्या पिढ्याना सुख अन समृद्धी लाभते त्याच पद्धतीने आदरणीय कृषीरत्न शरदचंद्रजी पवार साहेब ,त्या काळचे प्रदेशाध्यक्ष छगनरावजी भुजबळ साहेब, ,स्व आर आर आबा पाटील,अरूनजी गुजराथी साहेब,ते आजचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या पर्यंत अनेक नेत्यांनी पक्ष मोठा करत असताना जी जी संधी पक्षाने दिले त्या त्या संधीचे सोनेच करून दाखवले,
तसेच युवकांचे पण असेच झाले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सध्याचे उच्च शिक्षण मंत्री उदयजी सामंत ,उमेश दादा पाटील,निरंजन डावखरे, संग्राम कोते पाटील,ते आजचे युवक प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत दादा वरपे ,सुरज दादा चव्हाण,यांनी प्रत्यनाची पराकाष्ठा करत युवकांना त्यांच्या योग्यतेने संधी देत ,काही खासदार झाले ,काही मंत्री ही झाले ,तर काही आमदार ही झाले हे केवळ फक्त अन फक्त पवार साहेबांच्या विचारा मुळेच शक्य झाले हे नाकारून चालणार नाही, मा श्री प्रफुल्ल पटेल साहेब ,अजितदादा पवार ,, जयंत पाटील,साहेब,सुप्रियाताई सुळे,सुनील तटकरे साहेब, स्व आर आर आबा, छगन भुजबळ साहेब,दिलीपराव वळसे पाटील,विजयसिंह दादा मोहिते पाटील साहेब ,बाळासाहेब पाटीलसाहेब ,जितेंद्र आव्हाड साहेब,धनंजय भाऊ मुंडे साहेब,शशिकांत शिंदे,साहेब, हसन मुश्रीफ,साहेब,आशा अनेक दिग्गज नेत्यांनी दिवसरात्र जनतेची सेवा केली.
अजितदादा नि तर उपमुख्यमंत्री च्या कार्यकाळात दर बुधवार अन गुरुवार,पक्ष कार्यालयात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत जनता दरबार भरवून महाराष्ट्र च्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या सर्व जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न राजकीय इतिहासात जनता दरबार घेऊन न्याय देणारा एकमेव नेता कोण असेल तर तो म्हणजे अजितदादा होय,एवढं काम साहेबांच्या शिलेदारानी केले पण मोदींच्या जाहिरात बाजीला भुलून अन विरोधीपक्ष म्हणून त्यांनी केलेला सत्ताधारी यांनी न केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप ही जनतेला खरे वाटू लागले हजारोचे आकडे,काँग्रेसचे नेत्यांचा काळा पैशाची यादी तरुणांना भुरळ घालत होती अन त्याच काळात तरुणांवर मोदी नावाच्या माणसाने जादू केली अन सत्तांतर झाले.
तरुणांना वाटत होते की मोदी आले की असे काही घडेल की सर्व देशाचे रस्ते डांबरीकरण काढून चांदीचेच रस्ते होतील,बेरोजगार तरुण हजारो रुपयांच्या पगारी घेईल पण लबाडाचे जेवणाचे निमंत्रण जेवल्याशिवाय खरं धरायचे नसते हे त्यांना समजलेच नाही, आशात 15 वर्ष सत्तेत असणारा पक्ष विरोधी बाकावर बसला ,रस्त्यावर उतरून लागला ,आलिशान गाडीत फिरणारे कार्यकर्ते दिसेनासे झाले,पण सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र शेवटपर्यंत पक्षाशी इमानेइतबारे सोबत राहिली, सत्ता बदलली की स्वतःच्या राज्यातील व्यापारी,सैन्य,व अधिकाऱ्यांच्या वागण्यात बदल होतो म्हणतात तसेच सर्व घडत गेले अन ज्यांना पक्षाने सत्तेच्या काळात भरभरून दिले तेच सत्ता गेली की सत्तेच्या दिशेने वाटचाल करू लागले,त्याच पद्धतीने ज्यावेळी 1980 साली साहेब कामानिमित्त लंडन दौऱ्यावर गेल्यानंतर साहेबांच्या 54 आमदारांपैकी 6 ते 7 साहेबांच्या सोबत राहिले अन बाकीचे आमदार साहेबांना सोडून गेले, याचा एवढा राजकीय वादळ उठले साहेबांना विरोधी पक्षनेते म्हणून काम करावे लागणार होते त्याच वेळी साहेब लंडन वरून येणार म्हंटल्यावर विमानतळ वर साहेबांच्या स्वागताला जो युवक वर्ग जमा झाला होता हे चित्र पाहून साहेब सुद्धा थक्क झाले होते त्यानंतर जे सोडून गेले ते पुन्हा राजकीय पटलावर दिसलेच नाही असे सांगतात पण त्याचे साक्षिदार त्यावेळी आम्ही नव्हतो पण..
2019 च्या विधानसभेचे साक्षीदार आम्ही झालो याचा अभिमान मला जरूर आहे,या वेळी ही साहेबांनी युवकांच्या ताकदीने सोलापूर जिल्ह्यापासून चालू झालेली रणधुमाळी अखंड महाराष्ट्र भर तो साहेबांचा दौरा युवकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्ही साहेबांच्याच सोबत म्हणून महाराष्ट्र मध्ये 80 वर्षाचा युवक महाराष्ट्र युवकांचे पुढील भवितव्य घडवण्यासाठी पुन्हा मैदानात उतरला अन 2019 ची विधानसभा भाजपचे 105 आमदार निवडून येऊन सर्वात मोठा पक्ष होऊन सुद्धा त्यांना मी विरोधी बाकावर बसवू शकतो हे संबंध महाराष्ट्र ला दाखवून दिले.
या काळात अनेक राजकीय घटना घडल्या अनेक साहेबांचे शिलेदार आपले पुढील पिढीच्या सोयी चे राजकारण जपण्यासाठी साहेबांची साथ सोडून गेले,आता साहेब अन साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष संपतो की काय अशी अवस्था असताना . ज्या साहेबांची राजकीय सुरुवात युवक मधून झाली होती अन आज याच राजकारणाची दिशा फक्त युवकच बदलू शकतो मग तो ८० वर्षाचा युवक जरी असला तरी म्हणून साहेब सोलापूर च्या सभेत म्हणाले होते कोण म्हणते मी म्हातारा झालो मी तर अजून तरुण (युवक ) आहे . आशा नेतृत्वाखाली एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना नक्कीच मला अभिमान आहे,की मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे याचा.
आज पक्ष खऱ्या अर्थाने युवकांच्या विचारसरणी चा पक्ष झाला ,ग्रामीण भाषेत सांगायचे झाले तर (पोक्ता) झाला असे म्हणावे लागेल,अन येणाऱ्या पुढील काळात नक्कीच राष्ट्रवादीला उंच भरारी घेऊ एवढेच बोलतो अन पुन्हा एकदा सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, यांना राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो अन साहेबांचे विचार पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेच्या मनात रुजवू या