<
भडगांव (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतिने संपुर्ण जिल्ह्यात मर्दानी महाराष्ट्राची हे अभियान राबवून जनतेला एक वेगळा माणूसकी जपण्याचा संदेश देत राष्ट्रावादी अध्यक्ष्या योजना पाटील यांनी भडगांव तालुका व शहरात आरोग्य,सेवा,सुविधा,सुरक्षा ई.क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा प्रदेशअध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे स्वाक्षरीचे सन्मानपत्र प्रदान करून सन्मान केला. 10 जून पक्षाचा 22 वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतिने राज्यात कोरोनाच्या महामारीच्या संकटात ज्यांनी जनतेसाठी कोरोना योद्धा म्हणुन महत्वाची भूमिका बजावली अशा महिलांसाठी “मर्दानी महाराष्ट्राची” हे अभियान राबवत आहे.
भडगांव तालुक्यातही जिल्हा निरीक्षक सुवर्णा शिंदे,जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील,मा.आमदार दिलीपभाऊ वाघ यांचे मार्गदर्शनाख़ाली योजना पाटील यांनी हे अभियान राबविले. तहसीलदार माधुरी आंधले,ता.आरोग्य अधिकारी डॉ.सुचिता आकडे,आंगनवाडी पर्यवेक्षिका के.आर.शिंदे,पो.कॉ.विमल सानप,सुवर्णा चौधरी,नर्गिस शेख,वैशाली म्हस्के,डॉ.सुवर्णा पाटील,डॉ.पल्लवी पाटील,आरोग्य सेविका भारती हरणे,आंगनवाड़ी सेविका संगीता महाजन,ज्योति देशमुख,कल्पना ठाकरे,शुभांगी भोसले,संगीता मोरे आदि महिलांना योजना पाटील यांनी सन्मानित केले. गौरव सन्मान केल्याने त्यांना पून्हा जोमाने काम करण्याची एक प्रकारची ऊर्जा मिळेल असे अध्यक्षा योजना पाटील नमूद केले.