<
जळगांव(बोदवड):-महाराष्ट्रातील सांगली, सातारा,कोल्हापूर येथे महापुरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत सर्व महाराष्ट्रातून जनता, बंधू भावाने ,स्वयंसेवी ,समाजवेक पुरग्रस्ताच्या मदतीस धावून येताना दिसत आहे. विविध प्रसार माध्यमातून व सोशियल माध्यमातून या मदतीसाठी आव्हानही केले जात आहे. मात्र याही पलीकडे मनुष्यमात्र साठी झटणाऱ्या मानसिकतेच्या पार जळगांव जिल्ह्यातील बोदवड तालुका येथील सामजिक कार्यकर्ते व आभाळमाय फाऊंडेशन चे संचालक मा संजय एन वराडे व हारूनभाई बागवान यांनी मुक्या जनावरांच्या ,प्राणी मात्राचा विचार करत भूतदया दाखवली आहे आणि त्यासाठी अभिनव संकल्पना मांडली आहे.
ज्यात, वरील सर्व पुरग्रस्त जिल्ह्यात संबंधित शासकीय अधिकारी जसे तहसीलदार,आपत्ती निवारण अधिकारी, यांच्याशी संपर्क साधून इतर जिल्ह्यातून जनावरांना चारा, ढेप, किंवा कुराण ,कुट्टी इत्यादी जमा करणे व मदतकर्त्या कडून संकलन झालेला चारा वाहनातून पूरग्रस्त जिल्ह्यात, भागात किंवा ठिकाणी शासकीय देखरेखीत मदत मागवून वाटपकेला जाईल. अशी व्यवस्था प्रस्थापित करून जनावरांचे पोषण या पूरग्रस्त काळात केले जाईल असा प्रयत्न केला आहे.या करिता मा संजय एन वराडे यांनी अश्या पद्धतीने मदत करण्याचे आव्हान जनतेला, व समाजहित, भूतदया दाखवणाऱ्या दानशूर लोकांना केले आहे.
या विषयी मा संजय वराडे यांनी सत्यमेव जयते च्या प्रतिनिधींशी संपर्क साधून लवकरच हा विचार करून कृतीत आणला जाईल, तसेच सूचना व मार्गदर्शनाचेही आव्हानही ९९७०२१२३२१या क्रमांकावर करावे असे सुचवले आहे.