<
राज्यात ४६ हजार ७४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि.१०: राज्यात आज १८७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५१७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३२५४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४६ हजार ७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ९३ हजार ७८४ नमुन्यांपैकी ९४ हजार ०४१ नमुने पॉझिटिव्ह (१५.८३ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६९ हजार १४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७२७ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार २२८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज १४९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- १२२ (मुंबई ९७, ठाणे १५, नवी मुंबई ५, उल्हासनगर ३, वसई-विरार २), नाशिक- ५ (जळगाव ५), पुणे- १० (पुणे १०), औरंगाबाद-७ (औरंगाबाद ७), लातूर-१ (बीड १), अकोला -३ (अकोला २, अमरावती १), नागपूर-१ (गडचिरोली १).
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ९४ पुरुष तर ५५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १४९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ८७ रुग्ण आहेत तर ४९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या १४९ रुग्णांपैकी १०४ जणांमध्ये (७० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३४३८ झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ६६ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू १८ एप्रिल ते ६ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ८३ मृत्यूंपैकी मुंबई ५८, ठाणे -९, नवी मुंबई – ५, जळगाव – ४,उल्हासनगर -३, वसई विरार – २,अमरावती – १ आणि गडचिरोली १ असे आहेत.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव रुग्णांचा तपशील
मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (५२,६६७), बरे झालेले रुग्ण- (२३,६९४), मृत्यू- (१८५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(७), ॲक्टिव रुग्ण- (२७,१०९)
ठाणे: बाधित रुग्ण- (१४,७२०), बरे झालेले रुग्ण- (५७०६), मृत्यू- (३७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (८६३५)
पालघर: बाधित रुग्ण- (१७३८), बरे झालेले रुग्ण- (६४५), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०४८)
रायगड: बाधित रुग्ण- (१५७५), बरे झालेले रुग्ण- (९८१), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव रुग्ण- (५३४)
नाशिक: बाधित रुग्ण- (१७०४), बरे झालेले रुग्ण- (११३०), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४७९)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (२२०), बरे झालेले रुग्ण- (१३९), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७२)
धुळे: बाधित रुग्ण- (३३४), बरे झालेले रुग्ण- (१३५), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (१७३)
जळगाव: बाधित रुग्ण- (१२८८), बरे झालेले रुग्ण- (५६९), मृत्यू- (१२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५९९)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (४४), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१२)
पुणे: बाधित रुग्ण- (१०,४०६), बरे झालेले रुग्ण- (६०७९), मृत्यू- (४३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३८८८)
सोलापूर: बाधित रुग्ण- (१४८३), बरे झालेले रुग्ण- (६५४), मृत्यू- (११२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७१७)
सातारा: बाधित रुग्ण- (६८१), बरे झालेले रुग्ण- (३६१), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२९२)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६७१), बरे झालेले रुग्ण- (४७०), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१९३)
सांगली: बाधित रुग्ण- (१८८), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७८)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१३३), बरे झालेले रुग्ण- (५१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८२)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३८१), बरे झालेले रुग्ण- (१९१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१७६)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२१७३), बरे झालेले रुग्ण- (१२८३), मृत्यू- (११७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७७३)
जालना: बाधित रुग्ण- (२२५), बरे झालेले रुग्ण- (१४८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७२)
हिंगोली: बाधित रुग्ण- (२१४), बरे झालेले रुग्ण- (१७९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३५)
परभणी: बाधित रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१९)
लातूर: बाधित रुग्ण- (१४७), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२५)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१४०), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५४)
बीड: बाधित रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव रुग्ण- (१५)
नांदेड: बाधित रुग्ण- (१७४), बरे झालेले रुग्ण- (११३), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५३)
अकोला: बाधित रुग्ण- (८८२), बरे झालेले रुग्ण- (४९७), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (३४४)
अमरावती: बाधित रुग्ण- (३०५), बरे झालेले रुग्ण- (२१०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७५)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (१६८), बरे झालेले रुग्ण- (११७), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३९)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (९८), बरे झालेले रुग्ण- (५६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३९)
वाशिम: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६)
नागपूर: बाधित रुग्ण- (८३१), बरे झालेले रुग्ण- (४९५), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३२४)
वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६)
भंडारा: बाधित रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (३१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (११)
गोंदिया: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (६७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (४५), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१९)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (४५), बरे झालेले रुग्ण- (३७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६०)
एकूण: बाधित रुग्ण-(९४,०४१), बरे झालेले रुग्ण- (४४,५१७), मृत्यू- (३४३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१२),ॲक्टिव रुग्ण-(४६,०७४)
(टीप-आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १८८ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३७५० झोन क्रियाशील असून आज एकूण १८ हजार ९९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६९.१६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.