<
चोपडा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वेळोदे शिवारातील विपीन वल्लभदास गुजराथी यांचा मालकीचे शेत साहेबराव केशव बागुल हे करीत असलेल्या शेतात मृत अवस्थेत बिबट्या आढळल्याने परिसरात घबराटीचे वातावरण झाले आहे.
सविस्तर असे की, वेळोदे शिवारातील विपीन वल्लभदास गुजराथी यांचा मालकीचे शेत साहेबराव केशव बागुल हे करीत असलेल्या शेतात मृत अवस्थेत बिबट्या आढळल्याने आज रोजी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती सकाळी या शेतातील कामासाठी असलेला बहादूर पावरा हा सकाळीं ११ वाजता कामावर केला असता कपाशीच्या शेतात मृत अवस्थेतील बिबट्या आढळल्याने हा इसम घाबरल्या अवस्थेत आपल्या मालकाला आणि पोलीस पाटीलला सदरील माहीती सांगितली त्यानुसार पोलीस पाटील मिलिंद अरुण करणकाळे यांनी पोलीस स्टेशन, व फॉरेस्टला कळविले असता फॉरेस्ट चे अधिकारी तात्काळ हजर झाले होते फॉरेस्टचे अधिकारी व्ही.एच.पवार, (सहा.वनरक्षक), पी.बी.पाटील (आर.एफ.ओ.), के.एल.धनगर
डी. बी.देवरे,पी.एस.सोनवणे, दीपिका पालवे, गोपाल गोविंदा पाटील, तसेच जळगाव येथील वन्यजिव अभ्यासक विवेक देसाई ह्यांनी सुद्धा आदीनी घटनास्थळी पोहचले होते या बिबट्याने दोन दिवसांपूर्वी गावातील धर्मासिंग छोटू पावरा यांच्या गायीचा फडश्या पडला होता ती गायचे मांस दुसऱ्या दिवशीही ह्या बिबट्याने खाल्ले असावे आणि यातूनच त्याला विषबाधा झाली असावी आणि तो मृत झाला असावा कारण त्या गायीला मारल्या पासून अवघ्या २००ते २५० मीटर अंतरावर ही घटना झाली आहे आणि रात्री १२ नंतरची घटना असावी असा कयास धरला जात आहे. जवळपास ४ वर्षांचा हा बिबट्या असून पुढील तपास पंचनाम्या द्वारे होईल असे सहा.वनसंरक्षक व्ही. एच. पवार यांनी बोलताना सांगितले. तसेच तीन डॉक्टर समितीचा आवाहल मागविला जाईल असेही त्यांनी सांगितले. यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक मोरणकर हे सुध्दा भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले