<
आतापर्यंत ४७ हजार ७९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले; राज्यात ४९ हजार ६१६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई, दि.१२ : राज्यात आज १७१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार ७९६ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४९ हजार ६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात सध्या ५३ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९५ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख २४ हजार ९७७ नमुन्यांपैकी १ लाख ०१ हजार १४१ नमुने पॉझिटिव्ह (१६.१८ टक्के ) आले आहेत राज्यात ५ लाख ७९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५५३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ६७ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
● राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ४७.३ टक्के एवढे आहे.
● राज्यातील मृत्यू दर – ३.७ टक्के
राज्यात आज १२७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- १०६ (मुंबई ९०, ठाणे ११, कल्याण-डोंबिवली ३, मीरा-भाईंदर १, वसई-विरार १), नाशिक- ३ (नाशिक २, धुळे १), पुणे- १२ (पुणे १२), कोल्हापूर-३ (सांगली ३), औरंगाबाद-२ (औरंगाबाद २), अकोला -१ (अमरावती १).
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ९२ पुरुष तर ३५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६७ रुग्ण आहेत तर ५२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १२७ रुग्णांपैकी ८९ जणांमध्ये (७० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३७१७ झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २० मे ते ९ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५५, ठाणे -१०, सांगली -३, कल्याण डोंबिवली – २,पुणे -२, मीरा भाईंदर – १, वसई विरार – १, नाशिक -१, धुळे -१आणि अमरावती – १ मृत्यू असे आहेत.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (५५,४५१), बरे झालेले रुग्ण- (२५,१५२), मृत्यू- (२०४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(७), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८,२४८)
ठाणे: बाधित रुग्ण- (१६,४४३), बरे झालेले रुग्ण- (६६४५), मृत्यू- (४१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३८४)
पालघर: बाधित रुग्ण- (२०५३), बरे झालेले रुग्ण- (६८८), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३१७)
रायगड: बाधित रुग्ण- (१७११), बरे झालेले रुग्ण- (१०३८), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१३)
नाशिक: बाधित रुग्ण- (१७८५), बरे झालेले रुग्ण- (११६४), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१९)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (२२६), बरे झालेले रुग्ण- (१६५), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)
धुळे: बाधित रुग्ण- (३५३), बरे झालेले रुग्ण- (१६८), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५८)
जळगाव: बाधित रुग्ण- (१५४०), बरे झालेले रुग्ण- (६३४), मृत्यू- (१२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८६)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (४८), बरे झालेले रुग्ण- (३०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४)
पुणे: बाधित रुग्ण- (११,२८१), बरे झालेले रुग्ण- (६३७९), मृत्यू- (४५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४४३)
सोलापूर: बाधित रुग्ण- (१६२०), बरे झालेले रुग्ण- (६५४), मृत्यू- (१२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४६)
सातारा: बाधित रुग्ण- (७१७), बरे झालेले रुग्ण- (३८४), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०६)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६८१), बरे झालेले रुग्ण- (५०४), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६९)
सांगली: बाधित रुग्ण- (२०७), बरे झालेले रुग्ण- (१०९), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१४८), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३९१), बरे झालेले रुग्ण- (२३९), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३७)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२४५७), बरे झालेले रुग्ण- (१३६०), मृत्यू- (१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९७२)
जालना: बाधित रुग्ण- (२५०), बरे झालेले रुग्ण- (१४८), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६)
हिंगोली: बाधित रुग्ण- (२३६), बरे झालेले रुग्ण- (१८४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)
परभणी: बाधित रुग्ण- (८१), बरे झालेले रुग्ण- (६८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)
लातूर: बाधित रुग्ण- (१६०), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१४०), बरे झालेले रुग्ण- (९६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)
बीड: बाधित रुग्ण- (६९), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१८)
नांदेड: बाधित रुग्ण- (२०४), बरे झालेले रुग्ण- (११७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८)
अकोला: बाधित रुग्ण- (९७९), बरे झालेले रुग्ण- (५०५), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३३)
अमरावती: बाधित रुग्ण- (३२४), बरे झालेले रुग्ण- (२३६), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (१७१), बरे झालेले रुग्ण- (११७), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (११७), बरे झालेले रुग्ण- (७३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)
वाशिम: बाधित रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८)
नागपूर: बाधित रुग्ण- (९६९), बरे झालेले रुग्ण- (५३६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२१)
वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६)
भंडारा: बाधित रुग्ण- (४७), बरे झालेले रुग्ण- (३१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६)
गोंदिया: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (६८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (०)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (४६), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (४८), बरे झालेले रुग्ण- (३८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०)
एकूण: बाधित रुग्ण-(१,०१,१४१), बरे झालेले रुग्ण- (४७,७९६), मृत्यू- (३७१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१२),ॲक्टिव्ह रुग्ण-(४९,६१६)
(टीप-आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २२३ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)