<
फैजपूर(किरण पाटील)- शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असून दि.१३ जून रोजी तब्बल ८ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून याला प्रशासनाने दुजोरा दिला आहे. संसर्ग रूग्णांच्या परिसरात फवारणीसह सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाला प्राप्त झालेल्या आवाहलात ८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात एका कोरोना योद्धा पोलिसाचा व एका ८ वर्षीय लहान बालिकेचा समावेश आहे. त्यामुळे फैजपूर येथील कोरोना बधितांची संख्या १९ वर गेली आहे. यातील ४ जण हे उपचार घेऊन घरी परतले आहे. त्यामुळे सद्यास्थितीत १५ बधितांवर उपचार सुरू आहे. शहरात प्रथमच ८ ने रुग्ण संख्या वाढली असून ही वाढती रुग्ण संख्या शहर व प्रशासनला चिंतेचा विषय बनला आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये चार रुग्ण हे पूर्वीच्या बधितांच्या संपर्कातील असून चार हे नवीन भागातील त्यामध्ये एका कॉरोनायोध्दा पोलिसचा समावेश आहे. फैजपूर शहरातील कंटेनमेंट झोनची संख्या ही ९ झाली आहे. शहरात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये, मास्क चा वापर करावा, सतत हात धुवावे किंवा सॅनिटीझर चा वापर करावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. सदर प्रशासनिय अधिकारी फैजपूर प्राताधिकारी डॉ.अजित थोरबोल, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सर्कल जी.डी. बंगाळे, तालाठी प्रशांत जावळे सह कर्मचारी व फैजपूर पोलीस स्टॅफ, होमगार्ड हे जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावीत आहे. शहरातील नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन सतत करीत आहे. प्रशासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांन कडून केली जात आहे.