<
जळगांव(प्रतिनिधी)- उल्का फाऊंडेशन मार्फत चित्रकला क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात.”The Artist Info” हा नविन उपक्रम उल्का फाऊंडेशन मार्फत राबविण्यात येणार असून या उपक्रमात “The Artist Info” या संकेतस्थळाच्या माध्यमातून चित्रकार नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. सदर संकेतस्थळावर आपल्याला नोंदणी झालेल्या सर्व चित्रकारांची माहिती मिळणार असून, चित्रकारांना यातून वेगवेगळ्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा या मागचा हेतू आहे. याव्यतिरिक्त, सदर संकेतस्थळावर आपल्याला चित्रकलेचे सादर झालेले उपक्रम यांची माहिती मिळणार आहे. चित्रकलेचे शिक्षण आणि या शिक्षणातील व्यवसायिक संधी याविषयी माहिती लवकरच अपडेट करण्यात येईल. या संकेतस्थळाचा चित्रकारांनी आपली नोंदणी करून घ्यावी अशी विनंती उल्का फाऊंडेशन मार्फत करण्यात आलेली आहे. सदर वेबसाईट ची संकल्पना ही कलाशिक्षक अविनाश घुगे सर, तसेच कलाशिक्षक दिनेश पाटील सर यांची असून, वेबसाईट मांडणी ही प्रणय कुवर आणि विजय महानुभाव यांनी केलेली आहे. अधीक माहिती साठी आपण खालील संकेतस्थळाला भेट देऊ शकता. तसेच जास्तीत जास्त चित्रकारांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थाध्यक्ष भूषण वले यांनी केले आहे. https://theartistinfo.blogspot.com/