<
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे गेल्या २४ तासात २ बळी गेले असून एक रुग्ण उस्मानाबाद शहरातील धारासुर मर्दिनी देवी रोड भागातील तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली. या रुग्णाला कॅन्सरचा आजार होता त्यातच त्याला कोरोनाची लागण झाल्याने त्याचा मृत्यू झाला.या रुग्णाच्या थेट संपर्कात सर्व जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
तर बळी गेलेला दुसरा रुग्ण उस्मानाबाद मधील उस्मानपुरा मधील काकानगर मधील ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे या पुरुषाला हृदयविकाराचा व मधुमेहाचा त्रास असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
दिनांक १३ जून रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात भूम येथील एक आणि परंडा येथील दोन रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता १४५ झाली आहे. पैकी १०५ बरे झाले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ७३ जणांचा स्वाब १३ जून रोजी लातूरला पाठवण्यात आला होता, पैकी तीन पॉजिटीव्ह , ७० निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत तर तीन पॉजिटीव्ह आले आहेत. पॉजिटीव्ह रुग्णापैकी एक रुग्ण भूम आणि दुसरे दोन रुग्ण हे परांडा येथील पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
जिल्हयात रुग्णाची संख्या अशी
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण १४५
एकूण बरे झालेले रुग्ण -१०५
उपचार घेत असलेले रुग्ण – ३५
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण – ५
तालुकानिहाय रुग्ण
उस्मानाबाद – ५९
कळंब- ३६
उमरगा – १६
परंडा – १७
लोहारा -२
वाशी – 0
तुळजापूर -१२
भूम -३